Maharashtra Police Bharti 2024; तरुणांसाठी मोठी बातमी, 17471 पदांसाठी पोलिस भरती होणार

WhatsApp Group

Maharashtra Police Bharti 2024: पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी मोठी गूड न्यूज आहे. राज्यात आता 100 टक्के पोलिस भरती होणार आहे. 100 टक्के  पोलीस भरती करण्यास वित्त विभागाने मंजूरी दिली आहे. यामुळे पोलिस भरतीचा माग्र मोकळा झाला आहे.  राज्यात तब्बल 17471  पोलिसांची भरती होणार आहे.

राज्य सरकारच्या इतर विभागांना फक्त 50 टक्के पदांची भरती करता येते.  पण पोलीस खात्यात 100 टक्के पदभरतीला मान्यता देण्यात आली आहे.  पोलीस शिपाई, बँण्डस्मँन,  पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई अशी एकूण 17471 पदांची भरती केली जाणार आहे.

सरकारी नोकरीत कंत्राटी भरतीवरून वाद सुरू असतानाच शिंदे फडणविस सरकारने काही महिन्यांपूर्वी पोलिसांची कंत्राटी भरती करण्याचा निर्णय घेतला होता.  सन 2023 मध्ये नवरात्रौत्सव, रमजान, दिवाळी अशा सणासुदीच्या काळात मुबई पोलिसांच्या मदतीसाठी कंत्राटी पोलिसांची नियुक्ती करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मुंबईत 3 हजार कंत्राटी पोलिसांची भरती केली जाणार होती.

राज्य सुरक्षा महामंडळाच्या जवानांमधून कंत्राटी भरती करण्याचा गृहखात्याचा प्लान होता. या जवानांना पोलिसांसारखे प्रशिक्षण देऊ कंत्राटी पद्धतीनं 11 महिन्यांसाठी भरती केली जाणार होती.  या कंत्राटी पोलिसांच्या तीन महिन्यांच्या पगारासाठी 30 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मुंबई पोलिसांकडे मनुष्यबळाची टंचाई असल्यानं नवीन भरती होईपर्यंत गृह खात्यानं हा निर्णय घेतल्याचं सरकारनं स्पष्ट केले होतो. मात्र, या निर्णयावरुन विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. मुंबईसारख्या संवेदनशील शहराची सुरक्षा कंत्राटी पोलिसांवर सोपवणं किती योग्य आहे असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. कंत्राटी भरतीविरोधात संभाजी ब्रिगेडनं मंत्रालयात आंदोलन केल होतो. जोरदार विरोध झाल्यामुळे सरकारने पोलिसांची कंत्राटी भरती करण्याचा निर्णय मागे घेतला होता.