पोलिसांचा लॉजवर छापा; अल्पवयीन मुलीची वेश्याव्यवसायातून सुटका…

WhatsApp Group

मुंबई : पोलिसांनी अल्पवयीन मुलीची देहव्यापार करणाऱ्या टोळीतून सुटका केली असून गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांनी गुप्त माहितीवरून एका लॉजवर छापा टाकून पीडित मुलीची वेश्याव्यवसायातून सुटका केली. पीडितेने सांगितले की, लक्ष्मण शेट्टी नावाचा दलाल तरुणीला वेगवेगळ्या ठिकाणी वेश्याव्यवसायात अडकवत होता. तरुणीला दलाल लक्ष्मण शेट्टी याने अर्नाळा येथील एका लॉजवर बोलावून तेथे ठेवले.

तसेच 29 ऑक्टोबर रोजी लॉज चालवणाऱ्या आकाश गुप्ता याने तिला वेश्याव्यवसायासाठी परदेशी जाण्यास भाग पाडले. याच लॉजमध्ये दुसरा आरोपी सुशांत पुजारी याने तिच्या इच्छेविरुद्ध अनेकवेळा तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे.