लष्कराने संसदेत घुसत विरोधी नेत्यांना केली अटक, देशात एकच गोंधळ

WhatsApp Group

इस्लामाबाद पोलिसांनी पाकिस्तानच्या संसद लॉजमध्ये कारवाईचा एक भाग म्हणून JUI-F MNA सलाहुद्दीन अयुबी आणि मौलाना जमाल-उद-दीन यांच्यासह 19 जणांना अटक केल्यावर पाकिस्तानच्या संसदेत गोंधळ उडाला आहे. जमियत उलेमा-ए-इस्लामच्या वर्दीधारी स्वयंसेवक दलाच्या सदस्य अन्सारुल इस्लामने संसद लॉजमध्ये घुसखोरी केल्यानंतर त्यांनी ही कारवाई केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.


इस्लामाबादचे पोलीस महानिरीक्षक मुहम्मद अहसान युनूस यांनी लॉजमधील कारवाईचा बचाव केला आहे. इस्लामाबादच्या पोलिस महानिरीक्षकांनी या कारवाईचे नेतृत्व केले. पाकिस्तानमध्ये इम्रान खान सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावानंतर राजकीय खळबळ माजली आहे. मौलाना फजल-उर-रहमान यांच्या पक्षाच्या खासदाराला गुरुवारी अटक केल्यानंतर विरोधकांनी सरकारविरोधात युद्ध पुकारले आहे.