गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत पोलिसांचा ठेका, पहा व्हिडिओ

WhatsApp Group

राज्यात शुक्रवारी जड अंत:करणाने गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. कोरोनामुळे तब्बल दोन वर्षांनंतर बाप्पाला थाटात निरोप देण्याची संधी गणेशभक्तांना मिळाली. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत भरपूर गर्दी पाहायला मिळाली. पुणे, मुंबई तसेच कोल्हापूरमध्ये लोकांचा वेगळाच उत्साह पाहायला मिळाला. दरम्यान गणपती विसर्जन मिरवणुकांमधील अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. अशाच एका व्हिडिओनं आता अनेकांचं लक्ष वेधलं आहे.