मोठी बातमी! राणा दाम्पत्याच्या घरी पोलीस दाखल

WhatsApp Group

मुंबई – अमरावतीच्या बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांच्या घरी पोलीस दाखल झाले आहेत. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये अटक झाली होती. ते जवळपास दोन आठवडे वेगवेगळ्या जेलमध्ये होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता.

त्यानंतर राणा दाम्पत्याच्या घराबाहेर शिवसैनिकांनी आंदोलन केले होते. त्यावेळी झालेल्या मोठ्या गदारोळानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. संबंधित प्रकरणी राणा दाम्पत्याची जामीनावर सुटका झाली होती. पण आता अमरावतीच्या एका वेगळ्या प्रकरणी राणा दाम्पत्याच्या मुंबई येथील घरी पोलीस दाखल झाले आहेत.

सूत्रांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाई फेक प्रकरणामध्ये हायकोर्टाचं वारंट निघालं आहे. त्यामुळे राजापेठ पोलिसांचे पथक आणि मुंबई पोलिसांचे पथक रवी राणा यांच्या मुंबई येथील फ्लॅटवर पोहोचले आहे.