मालवण, फोटो व्हायरलप्रकरणी तरुणास पोलिस कोठडी

WhatsApp Group

मालवण – तालुक्यातील एका युवतीचा फोटो अश्‍लील पद्धतीने एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी भोसरी-पुणे येथील एका तरुणाला येथील पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. आज त्याला कुडाळ येथील न्यायालयामध्ये हजर केले असता ७ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

संबंधित युवतीने येथील पोलिस ठाण्यामध्ये दिलेल्या तक्रारीनुसार, काही दिवसांपूर्वी संशयिताविरोधात विनयभंग व फोटो एडिटप्रकरणी आयटी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी साहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन चव्हाण व त्यांच्या पथकाने सायबर सेलच्या मदतीने भोसरी-पुणे येथून एका २२ वर्षीय संशयित तरुणाला ताब्यात घेतले.

संशयित तरुण हा कंपनीत कामाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याला पोलिस ठाण्यात आणून चौकशीअंती अटक करण्यात आली. आज त्याला कुडाळ येथील न्यायालयामध्ये हजर केले असता ७ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक विजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन चव्हाण, पोलिस कर्मचारी सुहास पांचाळ, दिलीप खोत, अजय येरम यांच्या पथकाने ही कारवाई केली. अधिक तपास पोलिस करत आहेत.