शानदार समारंभात संभाजीराजेंना पोलंडचा ‘द बेने मेरिटो’ पुरस्कार प्रदान

WhatsApp Group

खासदार संभाजीराजे यांना मंगळवारी दिल्ली येथे झालेल्या शानदार समारंभामध्ये पोलंडचे परराष्ट्रमंत्री झ्बिग्नीव राऊ यांच्या हस्ते ‘द बेने मेरिटो’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. दिल्ली येथील पोलंड दूतावासात हा समारंभ पार पडला. पोलंडच्या नागरिकांना किंवा पोलंड देशाला सहकार्य केलेल्या इतर देशातील नागरिकांना हा पुरस्कार देण्यात येतो.

१४ सप्टेंबर २०१९ रोजी झालेल्या या कार्यक्रमामध्ये पोलंडचे उपपरराष्ट्रमंत्री मार्सिन प्रझिडाक आणि भारतातील पोलंडचे राजदूत ॲडम बुराकोव्स्की यांच्या हस्ते १९४२ ते १९४९ या काळात येथे वास्तव्य करणाऱ्या या पोलिश कुटुंबांच्या आणि नागरिकांच्या स्मरणार्थ एक स्मृतिस्तंभाचे अनावरण आणि संग्रहालयाची पायाभरणी करण्यात आली होती.

भारत व पोलंड या दोन्ही राष्ट्रांमधील हा ऐतिहासिक बंध पुन्हा जोपासण्यासाठी संभाजीराजे यांनी केलेल्या प्रयत्नांचा गौरव करण्यासाठी त्यांना हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे.