धुळे – धुळेमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एकाच कुटुंबातील पाच जणांनी विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना जवळ असलेल्या अवधान गावामधील दौलत नगरात सोमवारी रात्री सव्वा दहाच्या दरम्यान घडली आहे. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकलेले नाही. सर्वांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
शिरपूर तालुक्यातीमधील दहिवद येथील गणेश गोपाळ (४२) हे धुळे एमआयडीसीत कामाला आहेत. अवधान येथे दौलत नगरामध्ये ते परिवारास वास्तव्यास आहेत. सोमवारी संध्याकाळी स्वत: गणेश गोपाळ, पत्नी सविता गोपाळ (३५), मुलगी जयश्री गोपाळ (१४), मुलगा गोविंदा गोपाळ (१२) आणि भारत पारधी (२४) यांनी विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.
ही घटना शेजारी राहणाऱ्या लोकांच्या लक्षात आली. त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना कळविली. मोहाडी पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पाचही जणांना वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकलेले नाही.