महाशिवरात्रीच्या प्रसादातून १२५ लोकांना विषबाधा, रूग्णांवर उपचार सुरू

WhatsApp Group

नंदुरबार – तालुक्यातील राकसवाडे (rakadwade) गावामध्ये महाशिवरात्रीच्या (mahashivratri) प्रसादामधून १२५ लोकांना विषबाधा झाली तर काही रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचं आरोग्य विभागकडून सांगण्यात आलं आहे. विषबाधेमुळे काही लोकांना उलट्या तर काही लोकांना जुलाबचा त्रास जाणवू लागला. मात्र उपचारानंतर सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. ४० जणांवर राकसवाडे आरोग्य केंद्रामध्येच उपचार सुरू आहेत अशी माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनाकडून देण्यात आली आहे.

गावात विषबाधा झाल्यामुळे डॉक्टर (Doctor) आणि अधिकारी आणि कर्मचा-यांनी राकसवाडे येथेच तळ ठोकला आहे. विषवाधा कशामुळे झाली याची चौकशी करण्यात येईल. कारण गावातल्या अनेक लोकांना विषबाधा झाल्यामुळे हा प्रकार कुणी जाणूनबुजून केलाय किंवा यात कशामुळे झालाय याची चौकशी करण्यात येणार आहे.