ठाकरे सरकारला दणका, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी!

WhatsApp Group

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक NCP leader Nawab Malik यांना दाऊद इब्राहिम मनी लाँडिरग प्रकरणात नवाब मलिक यांना स्पेशल पीएमएलए कोर्टाने Special PMLA court 3 मार्चपर्यंत  ईडी कोठडी ठोठावली आहे. बुधवारी दुपारी आठ तासांच्या चौकशीनंतर अंमलबजावणी संचलनालयाकडून Enforcement Directorate नवाब मलिक यांना अटक करण्यात आली होती.


नवाब मलिक यांना मनी लाँडिरग प्रतिबंधक कायदा, २००२ (पीएमएलए) अंतर्गत ही अटक करण्यात आली आहे. नवाब मलिक यांच्या अटकेनतंर ठाकरे सरकारकडून केंद्रीय एजन्सीद्वारे सरकारची बदनामी सुरु असल्याचा आरोप करण्यात आला आहे.  मलिक यांना कोठडीत पाठवल्यानंतर त्यांच्या ट्विटर हँडलवरून ट्विट करण्यात आले. या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ”कुछ ही देर की खामोशी है फिर शोर आएगा, तुम्हारा तो सिर्फ वक्त है हमारा दौर आएगा!’


नवाब मलिक यांनी केंद्र सरकार आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापराच्या विरोधात आवाज उठवल्याने त्यांना त्रास दिला जात आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. मलिक उघडपणे बोलत असल्यानेच अशी कारवाई होण्याची आम्हाला भीती होती, असेही पवार म्हणाले. तर शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्वीट करत नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला जाणार नाही असं म्हटले आहे.