दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घरकुल योजनेचा पहिला हप्ता लाभार्थ्यांना पाठविला आहे. त्रिपुरा राज्यातील 1 लाख 47 हजारांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यात हा हप्ता पाठविण्यात आला आहे. लाभार्थ्यांना पहिला हप्ता हा 38 हजार रुपयांचा देण्यात आला आहे. एकूण 709 कोटी रुपये 1 लाख 47 लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.
PM Narendra Modi transfers the first instalment of Pradhan Mantri Awaas Yojana – Gramin (PMAY-G) to more than 1.47 lakh beneficiaries of Tripura. pic.twitter.com/Apj2asBCtq
— ANI (@ANI) November 14, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून लाभार्थ्यांशी संवाद साधला. जनतेशी संवाद साधत मोदी म्हणाले की, या हप्त्याचे पैसे खर्च फक्त घर बांधण्यासाठी वापरा, इतर ठिकाणी या पैश्यांचा वापर करू नका ,जसजसे घराचे काम होईल तसे पुढच्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील असं मोदी म्हणाले.