पंतप्रधान नरेंद्र मोदी बनले जगातील सर्वात लोकप्रिय नेते!

WhatsApp Group

नवी दिल्ली – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून निवड झाली आहे. अमेरिकन डेटा इंटेलिजन्स फर्म ‘मॉर्निंग कन्सल्ट’ने ( Morning Consult ) केलेल्या सर्वेक्षणात पंतप्रधान मोदींचे अप्रूव्हल रेटिंग अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यापेक्षा जास्त आहे.

‘मॉर्निंग कन्सल्ट’ च्या सर्वेक्षणात पंतप्रधान मोदींचे अप्रूव्ह रेटिंग 70% आहे. जगातील 13 राष्ट्रप्रमुखांच्या यादीत पंतप्रधान मोदी पहिल्या क्रमांकावर आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सहाव्या तर बोरिस जॉन्सन दहाव्या क्रमांकावर आहेत.

मॉर्निंग कन्सल्टच्या सर्वेक्षणानुसार मॅक्सिकोचे अध्यक्ष लोपेझ ओब्राडोर दुसऱ्या स्थानी आहेत. त्याची मान्यता रेटिंग 66% आहे. तिसऱ्या क्रमांकावर इटलीच्या पंतप्रधान मारिओ ड्रॅघी, चौथ्या क्रमांकावर जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल आणि पाचव्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आहेत.

गेल्या एका वर्षात पीएम मोदींचे अप्रूव्हल रेटिंग नेहमीच 70 टक्क्यांच्या वर राहिले आहे. जेव्हा कोविडची दुसरी लाट एप्रिल-मेमध्ये देशात आली तेव्हा त्याचे रेटिंगही घसरले. एप्रिल ते जुलैपर्यंत पीएम मोदींचे अप्रूव्हल रेटिंग 70 टक्क्यांपेक्षा कमी राहिले होते मात्र ऑगस्टपासून ते 70% च्या वर राहिले आहे.


जागतिक नेत्यांचे रेटिंग पहा

नरेंद्र मोदी – 70 टक्के
लोपेझ ओब्राडोर – 66 टक्के
मारिओ ड्रॅघी – 58 टक्के
अँजेला मर्केल – 54 टक्के
स्कॉट मॉरिसन – 47 टक्के
जस्टिन ट्रुडो – 45 टक्के
जो बिडेन – 44 टक्के
फुमियो किशिदा – 42 टक्के
मून जे-इन – 41 टक्के
बोरिस जॉन्सन – 40 टक्के
पेड्रो सांचेझ – 37 टक्के
इमॅन्युएल मॅक्रॉन – 36 टक्के
जैर बोलसोनारो – 35 टक्के