
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचं कौतुक केलं असून डबल इंजिन सरकार वेगाने काम करत असल्याचं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्ग तसंच इतर विकासकामांचे उद्घाटन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीत आपल्या भाषणाची सुरुवात करताच उपस्थितांनी टाळ्या वाजवत कौतुक केलं. विकासकामांचं उद्धाटन करताना आपल्या आनंद होत असल्याची भावना यावेळी पीएम मोदींनी व्यक्त केली.
A very special day for Maharashtra! A bouquet of development works are being launched from Nagpur, which will transform lives of people. #MahaSamruddhi https://t.co/8QlJXbRGcs
— Narendra Modi (@narendramodi) December 11, 2022