
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांचे निधन झाले आहे. अहमदाबाद येथील यूएन मेहता हॉस्पिटलच्या कार्डिओलॉजी अँड रिसर्च सेंटर हॉस्पिटलमध्ये आज पहाटे 3.30 च्या सुमारास त्यांचे निधन झाले. आईच्या निधनानंतर खुद्द पीएम मोदींनी ट्विट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
पीएम मोदींनी ट्विट करून आईला श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले की “आईमध्ये मी कायमच त्या त्रिमूर्तिचा अनूभव घेतला ज्यात एक तपस्व्याची यात्रा, निष्काम कर्मयोग्याचं प्रतीक आणि मूल्य दिसून आली,” असं मोदी म्हणाले आहेत.
शानदार शताब्दी का ईश्वर चरणों में विराम… मां में मैंने हमेशा उस त्रिमूर्ति की अनुभूति की है, जिसमें एक तपस्वी की यात्रा, निष्काम कर्मयोगी का प्रतीक और मूल्यों के प्रति प्रतिबद्ध जीवन समाहित रहा है। pic.twitter.com/yE5xwRogJi
— Narendra Modi (@narendramodi) December 30, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन यांची प्रकृती मंगळवारी खालावली, त्यानंतर त्यांना अहमदाबादमधील यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले. हीराबेन यांना मंगळवारी अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. यानंतर त्यांना अहमदाबादच्या यूएन मेहता हॉस्पिटलच्या कार्डिओलॉजी अँड रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याच्या आईचे एमआरआय आणि सीटी स्कॅन केले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे रुग्णालयाकडून गुरुवारी निवेदन देण्यात आले. मात्र शुक्रवारी सकाळी त्यांचे निधन झाले.