
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना अहमदाबाद येथील यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, हिराबा यांना रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. पीएम मोदी दुपारी 3 वाजता अहमदाबादला पोहोचू शकतात.
हिराबेन सध्या गांधीनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धाकटे बंधू पंकजभाई यांच्यासोबत रायसन येथील वृंदावन बंगला-2 मध्ये राहत आहेत. गुजरात निवडणुकीच्या मतदानादरम्यान 4 डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदींनी त्यांची आई हीराबेन यांची गांधीनगरमध्ये भेट घेतली.