ईशान्येत पुन्हा चालली मोदींची जादू, 8 पैकी 6 राज्यात भाजपचे सरकार

WhatsApp Group

पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ईशान्येत शानदार कामगिरी केली आहे.. 2023 मध्ये होणाऱ्या निवडणूका या 2024 साठीची सेमीफायनल मानली जात आहे. यात भाजपने भाजपने विजयाचा शानदार सुरूवात केली आहे. भाजपने त्रिपुरा आणि नागालँडमध्ये दणदणीत विजय मिळवला असून मेघालयमध्येही भाजप सरकार स्थापन करू शकते.

ईशान्येतील तिन्ही राज्यांमध्ये मोदी जादू पुन्हा दिसली BJP Consolidates Its Position In The North East. त्रिपुरामध्ये भाजप पुन्हा सरकार बनवणार आहे, नागालँडमध्येही भाजप मित्रासोबत सत्तेत परतणार आहे, तर मेघालयमध्ये भाजप सरकारचा भाग असू शकते. ईशान्येतील तिन्ही राज्यांच्या निवडणुकीत भाजपची प्रत्येक रणनीती प्रभावी ठरली आणि विरोधक अपयशी ठरलेले पाहायला मिळत आहेत.

भाजप विजयाचा आनंद साजरा करत असतानाच, त्रिपुरातील पराभवानंतर काँग्रेस आणि डाव्यांना मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस आणि डाव्यांना त्रिपुराची सत्ता हवी होती, त्यामुळे विचारधारा आणि विचारसरणीला बगल देत डावे आणि काँग्रेसने निवडणुकीपूर्वी युती केली. मात्र आता दोन्ही पक्ष पराभवाची वेगवेगळी कारणे देत आहेत. पराभव डाव्यांमुळे झाला असे काँग्रेस म्हणत आहे.

मेघालयात भाजप एकटी का लढली? : मेघालयात भाजपचे सरकार होते. एनपीपी म्हणजेच नॅशनल पीपल्स पार्टीसोबत सरकार एकत्र चालत होते, पण इथे दोन्ही पक्षांनी निवडणूकपूर्व युती केली नाही, दोन्ही पक्षांनी निवडणुका स्वतंत्रपणे लढल्या. मेघालयातील सर्व ६० जागा स्वबळावर लढवण्याचा भाजपचा हेतू होता. त्रिपुरा आणि नागालँडप्रमाणेच मेघालयातही भाजपला स्वबळावर मजबूत व्हायचे आहे, जेणेकरून आगामी निवडणुकीत मेघालयात भाजपचा स्वतःचा मुख्यमंत्री असावा.

भाजपसाठी ही निवडणूक 2018 सारखी कसोटीची होती, पण काँग्रेससोबत 2018 पासून सुरू झालेला खेळ अखंड सुरू राहिला. 2018 च्या निवडणुकीत मेघालयमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. 18 जागा जिंकल्या पण सरकार बनवता आले नाही, त्यानंतर 2021 मध्ये मुकुल संगमा यांच्या नेतृत्वाखालील 12 आमदार टीएमसीमध्ये सामील झाले. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत टीएमसीला खातेही उघडता आले नव्हते. पण २०२३ च्या निवडणुकीत टीएमसीने आधी काँग्रेसच्या आमदारांना आपल्या गोटात आणले आणि काँग्रेसला दुहेरी आकडाही गाठता आला नाही.


काँग्रेस आपल्या नेत्यांना आणि आमदारांना आपल्या गोठात ठेवू शकत नाहीये. काँग्रेससोबत हे एकदा नाही तर अनेक वेळा घडले आहे आणि भाजपसोबतच आपल्याच जुन्या नेत्यांमुळे काँग्रेसला प्रत्येक राज्यात, प्रत्येक निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

8 पैकी 6 राज्यात भाजप सत्तेत: 2003 मध्ये अरुणाचल प्रदेशातील एक अपवाद वगळता, 2016 पर्यंत भाजप ईशान्येकडील कोणत्याही राज्यात सत्तेत नव्हता. याउलट आज येथे 8 पैकी 6 राज्यात भाजपची सत्ता आहे. आसाम, त्रिपुरा, अरुणाचल आणि मणिपूरमध्ये भाजपचे मुख्यमंत्री आहेत. नागालँड आणि मेघालयमध्ये भाजप सत्ताधारी आघाडीचा भाग आहे. मिझोराम आणि सिक्कीममध्ये या राज्यांमध्ये सरकार चालवणारे पक्ष भाजपच्या नेतृत्वाखालील नॉर्थ ईस्ट डेमोक्रॅटिक अलायन्स (NEDA) चा भाग आहेत. मागील दोन लोकसभा निवडणुकांचे निकाल हे देखील दर्शवतात की ईशान्येतील केंद्रीय राजकीय शक्ती म्हणून भाजपने काँग्रेसची जागा घेतली आहे.