PM मोदी इटली दौऱ्यावर रवाना, G7 शिखर परिषदेत सहभागी होणार

WhatsApp Group

पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीला रवाना झाले आहेत. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी गुरुवारी संध्याकाळी इटलीला भेट देत आहेत. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवार, 14 जून रोजी G7 आउटरीच शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. शिखर परिषदेच्या बाजूला पंतप्रधान मोदी आणि इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यात द्विपक्षीय बैठकही होणार आहे. लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर आणि तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच परदेश दौऱ्यावर जात आहेत.