PM मोदींनी केले महाकाल कॉरिडॉरचे उद्घाटन

WhatsApp Group

Mahakal Lok Inauguration: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मध्य प्रदेशातील उज्जैन येथे महाकाल लोक कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. लॉन्चिंगपूर्वी पीएम मोदींनी महाकालेश्वर मंदिरात पूजा आणि आरती केली. यासोबतच पीएम मोदींनी महाकाल गर्भगृहात पूजा केली.

महाकालचा कॉरिडॉर पहिल्या टप्प्यात 316 कोटी रुपयांमध्ये विकसित करण्यात आला आहे. 900 मीटर पेक्षा जास्त लांबीचा महाकाल लोक कॉरिडॉर जुन्या रुद्र सागर तलावाभोवती पसरलेला आहे. उज्जैनमधील जगप्रसिद्ध महाकालेश्वर मंदिराच्या आसपासच्या परिसराचा पुनर्विकास करण्याच्या प्रकल्पाचा एक भाग म्हणून रुद्र सागर तलावाचे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे.

देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या महाकालेश्वर मंदिरात या ज्योतिर्लिंगाची स्थापना करण्यात आली असून देश-विदेशातून येथे मोठ्या संख्येने भाविक येतात. या कॉरिडॉरसाठी नंदी गेट आणि पिनाकी गेट असे दोन भव्य प्रवेशद्वार बनवण्यात आले आहेत. हा कॉरिडॉर मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे जातो आणि वाटेत विहंगम दृश्ये दिसतात.