इंडिया गेटवर सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा

WhatsApp Group

नवी दिल्ली – भारताच्या राजधानीत दिल्ली येथील इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस Subhash Chandra Bose statue  यांचा पुतळा बसवण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा ग्रॅनाइटचा पुतळा बसवण्यात येणार असल्याची माहिती पीएम मोदींनी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करत दिली माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले, “संपूर्ण देश नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125 वी जयंती साजरी करत आहे, त्यामुळे मला सांगताना आनंद होत आहे की, इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भव्य ग्रॅनाइटचा पुतळा बसवला जाईल.


सर्वप्रथम नेताजींचा होलोग्राम पुतळा बसवण्यात येणार आहे

पीएम मोदींनी आणखी एका ट्विटमध्ये लिहिले की, ‘जोपर्यंत नेताजी बोस यांचा भव्य पुतळा तयार होत नाही, तोपर्यंत त्या ठिकाणी होलोग्राम पुतळा बसवला जाईल. नेताजींच्या जयंतीदिनी 23 जानेवारीला मी होलोग्राम पुतळ्याचे अनावरण करेन.

इंडिया गेटवर गेल्या 50 वर्षांपासून प्रज्वलित असलेली अमर जवान ज्योती आज राष्ट्रीय युद्ध स्मारकात जळत असलेल्या ज्योतीमध्ये विलीन होणार आहे.