PM Kisan 11th Installment: दहा कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 11व्या हप्त्याची रक्कम पोहोचली, असे चेक करा बॅलेन्स

WhatsApp Group

PM Kisan Samman Yojana 11th Installment: पंतप्रधान मोदींनी आज शिमला येथून पीएम किसान सन्मान (PM Kisan Samman Yojana) योजनेअंतर्गत 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या (PM Kisan Beneficiaries) खात्यामध्ये 2,000 रुपये हस्तांतरित (PM Kisan 11th Installment) केले आहे. केंद्रातील भाजप सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त गरीब कल्याण संमेलनामध्ये पंतप्रधान सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी केंद्राच्या आठ मंत्रालयांच्या 16 योजनांतर्गत देशातील प्रत्येक जिल्ह्यातील निवडक लाभार्थ्यांशी आभासी संवाद देखील साधला.

शेतकऱ्यांना यो योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणे आवश्यक करण्यात आले आहे. त्यामुळे 11वा हप्ता ( PM Kisan 11th Installment) खात्यामध्ये जमा होण्यापूर्वीच ही प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगण्यात आलं आहे. देशातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्याच्या प्रयत्नात केंद्र सरकारने प्रधानमंत्री सन्मान किसान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) सुरू केली आहे.

यादीत असे तपासा तुमचे नाव

  • यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान योजनेची अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जावे लागेल.
  • आता होमपेजवर तुम्हाला Farmers Corner चा पर्याय दिसेल.
  • Farmers Corner सेक्शनमध्ये Beneficiaries List पर्यायावर क्लिक करा.
  • आता ड्रॉप डाउन सूचीमधून राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.
  • यानंतर तुम्ही ‘Get Report’ वर क्लिक करा.
  • यानंतर लाभार्थ्यांची संपूर्ण यादी दिसेल, त्यात तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.

असे चेक करा बॅलेन्स

  • सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान मोबाईल अॅप डाउनलोड करावे लागेल. यासाठी तुम्ही pmkisan.gov.in वर जाऊ शकता.
  • जर तुम्ही वेबसाइटला भेट दिली तर तुम्हाला होमपेजवरून डाउनलोड PMKISAN मोबाइल अॅप वर क्लिक करावे लागेल. तथापि, तुम्ही ते थेट Google Play Store वरून PMKISAN GoI शोधून डाउनलोड करू शकता.
  • यानंतर, वापरकर्त्यांना अॅपमध्ये प्रवेश केल्यानंतर ‘लाभार्थी स्थिती’ टॅबवर क्लिक करावे लागेल आणि त्यानंतर आधार क्रमांक, खाते क्रमांक किंवा मोबाइल क्रमांकाचा पर्याय निवडावा लागेल.
  • यानंतर, कोणताही एक पर्याय निवडा आणि ‘डेटा मिळवा’ वर टॅप करा. येथून तुम्हाला तुमची स्थिती कळेल.
  • आम्ही तुम्हाला सांगतो की, वापरकर्ते आधारनुसार नाव दुरुस्त करणे, योजनेबद्दल जाणून घेणे आणि अॅपद्वारे हेल्पलाइन नंबर डायल करणे यासारख्या गोष्टी देखील करू शकतात.