PM किसानचा 21 वा हप्ता येणार ‘या’ दिवशी! खात्यात थेट जमा – तुमचं नाव यादीत आहे का?

WhatsApp Group

पीएम किसान योजना ही केंद्र सरकारची एक खूप महत्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत देशभरातील पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी ₹2,000 रुपये दिले जातात. आतापर्यंत सरकारने 20 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवले आहेत. शेवटचा म्हणजे 20 वा हप्ता 2 ऑगस्ट 2025 रोजी जमा झाला होता. आता सर्व शेतकरी 21 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत.pm kisan namo shetkari

सरकार दर चार महिन्यांनी पैसे पाठवते, त्यामुळे पुढचा म्हणजे 21 वा हप्ता नोव्हेंबर 2025 मध्ये मिळण्याची शक्यता आहे. अजून सरकारने याची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही, पण अंदाजानुसार हा हप्ता नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात खात्यात जमा होऊ शकतो.

मात्र, यावेळी थोडा उशीर होण्याची शक्यता आहे कारण नोव्हेंबर महिन्यात बिहारमध्ये निवडणुका होत आहेत. निवडणुकीच्या काळात आचारसंहिता लागू असते, त्यामुळे सरकारला पैसे पाठवण्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे असा अंदाज आहे की बिहार निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर, म्हणजेच 14 नोव्हेंबरनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील.

या योजनेद्वारे सरकार थेट DBT (Direct Benefit Transfer) पद्धतीने प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यात ₹2,000 रुपये जमा करते.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे पीएम किसान योजनेचा 21 वा आणि नमो शेतकरी योजनेचा 8 वा हप्ता दोन्ही एकत्र येणार आहेत. म्हणजेच शेतकऱ्यांना एकूण ₹4,000 रुपये खात्यात मिळतील. त्यामुळे सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी आपले बँक खाते आणि हप्ता यादी नक्की तपासावी.