PM किसान योजना: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, बँक खात्यात पैसे झाले जमा

WhatsApp Group

नवी दिल्ली – देशभरातील करोडो शेतकऱ्यांना चागंली मोठी बातमी मिळाली आहे. PM किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनूसार पीएम किसान योजनेअंतर्गत केंद्र सरकारने 10 कोटी पर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे पाठवले आहेत.
सरकारने आतापर्यंत 11.37 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 1.58 लाख कोटी रुपये जमा केले आहेत. पीएम किसान योजनेअंतर्गत, नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी 6,000 रुपये जमा केले जातात. ही रक्कम तीन वेळा पाठवली जाते. शेतकऱ्यांना एकावेळी दोन हजार रुपये मिळतात.

पीएम किसान योजनेअंतर्गत पैसे मिळवण्यासाठी तुमचे नाव यादीत असणे आवश्यक आहे. तुमचे नाव नोंदणी यादीत आहे की नाही हे तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता.

1. तुम्हाला PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जावे लागेल.
2. होम पेजवर तुम्हाला फार्मर्स कॉर्नर नावाचा पर्याय दिसेल.
3. फार्मर्स कॉर्नर पर्यायावर क्लिक केल्यावर, तुम्हाला लाभार्थी यादीचा पर्याय दिसेल, ज्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल.
4. यानंतर तुम्हाला राज्य, जिल्हा, उपजिल्हा आणि गाव निवडावे लागेल. येथून तुम्हाला GATE रिपोर्ट केल्यानंतर संपूर्ण यादीबद्दल माहिती मिळेल. यामध्ये तुमचे नाव यादीत आहे की नाही हे पाहू शकता.

या शेतकऱ्यांना मिळणार नाही PM-किसान योजनेचा लाभ!

पीएम-किसान योजनेंतर्गत असे अनेक लोक आहेत ज्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. अभियंते, वकील, निवृत्त पेन्शनर्स, घटनात्मक पदांवर बसलेल्या लोकांचे कुटुंब, केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचारी इ. त्याचबरोबर पती-पत्नी दोघांनाही पीएम किसान योजनेअंतर्गत दरवर्षी सहा हजार रुपये मिळणार नाहीत. दोघांपैकी एकालाच ही रक्कम मिळू शकते.