शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! PM Kisanच्या ११व्या हप्त्याबाबत केंद्र सरकारने दिली ‘ही’ माहिती

WhatsApp Group

नवी दिल्ली – पंतप्रधान किसान सन्मान निधी PM Kisan Samman nidhi योजनेअंतर्गत देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना केंद्र सरकारने नवीन वर्षाची भेट दिली आहे. केंद्र सरकारने १ जानेवारी रोजी पीएम किसानच्या १० व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले. पीएम किसानचे पैसे अद्याप तुमच्या खात्यात आले नाहीत, तर तुम्ही त्वरित तुमचा तपशील तपासावा. अन्यथा ११व्या हप्त्याचे पैसेही मिळणार नाहीत. पीएम किसान योजनेच्या ११व्या हप्त्याबाबत केंद्र सरकारने ही मोठी माहिती दिली आहे PM Kisan 11th Installment.

केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ६००० रुपये मिळतात. जे ३ हप्त्यांमध्ये दिले जाते. यामध्ये २०००-२००० रुपयांच्या ३ हप्त्यांचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात.

मिळालेल्या माहितीनुसार, पीएम किसान योजनेच्या ११व्या हप्त्याचे पैसे एप्रिल महिन्यात जारी केले जाऊ शकतात. १ जानेवारी २०२२ रोजी, १०व्या हप्त्याचे पैसे सरकारने १०.०९ कोटी लाभार्थ्यांच्या खात्यात पाठवले. सरकारने २०,९०० कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित केली होती.

हेही वाचा – पंतप्रधानांच्या सुरक्षेची नेमकी जबाबदारी कोणाची? सुरक्षेचा रोजचा खर्च किती?

अशी तपासा संपूर्ण माहिती

  • सर्वप्रथम तुम्हाला pmkisan.gov.in या वेबसाइटवर जावे लागेल.
  • या वेबसाईटच्या उजव्या बाजूला फार्मर्स कॉर्नरवर क्लिक करा.
  • आता तुम्हाला लाभार्थी स्थितीवर क्लिक करावे लागेल.
  • तुमची स्थिती तपासण्यासाठी तुम्हाला आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक यासारखे सर्व तपशील भरावे लागतील.
  • प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, आपण सूचीमध्ये आपले नाव तपासू शकता.

पैसे न मिळाल्यास या द्वारे करा तक्रार

  • पीएम किसान टोल फ्री क्रमांक: १८००११५५२६६
  • पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक: १५५२६१
  • पीएम किसान लँडलाइन क्रमांक: ०११-२३३८१०९२, २३३८२४०१
  • पीएम किसानची नवीन हेल्पलाइन: ०११-२४३००६०६०
  • पीएम किसानची आणखी एक हेल्पलाइन आहे: ०१२०-६०२५१०९
  • ई-मेल आयडी: [email protected]

???? ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि माहिती-मनोरंजन! या बातम्यांसाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये नक्की Add व्हा ???? https://chat.whatsapp.com/FT9G2GTaGLm4DsImkvflms

For more updates, be socially connected with us on – Instagram, Twitter, Facebook