PM Kisan : शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार 14 वा हप्ता? जाणून घ्या

WhatsApp Group

देशभरातील सुमारे 10 कोटी शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) योजनेचा लाभ मिळत आहे. मात्र, किसान सन्मान निधीचा 14 वा हप्ता काही काळ रखडला आहे, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. पण आता समोर येत असलेल्या माहितीनुसार पीएम किसान सन्मान निधीची रक्कम 30 जूनपर्यंत नसून जुलैच्या पहिल्या आठवड्यात येऊ शकते. केंद्र सरकार किसान सन्मान निधीचे पैसे 30 जूनपर्यंत शेतकऱ्यांना देईल अशी अटकळ याआधी लावली जात होती.

याआधी 27 फेब्रुवारी 2023 रोजी देशातील करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात 13वा हप्ता आला होता. हा हप्ता जाहीर करण्याची घोषणा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. वास्तविक, पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत, भारत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत करते. मोदी सरकार हे पैसे 2000-2000 रुपयांच्या 3 हप्त्यांमध्ये जारी करते. मात्र, आता 14 व्या हप्त्याबाबत शेतकरी चिंतेत असून सोशल मीडियावरही या चर्चेला उधाण आले आहे.

यांच्या खात्यात पैसे येणार नाहीत

अनेकांना पीएम किसान सन्मान निधीचा 14वा हप्ता मिळणार नाही. वास्तविक, हे असे लोक आहेत ज्यांचा 13 वा हप्ता अद्याप आलेला नाही किंवा ज्यांचे ई-केवायसी अद्याप झालेले नाही. तुमच्या आधार कार्डमध्ये चूक झाली तरी तुमचा 14 वा हप्ता थांबवला जाऊ शकतो. दुसरीकडे, जर तुमचे ई-केवायसी झाले नसेल, तर ते पूर्ण करा. यासोबतच तुमच्या आधार कार्डमध्ये काही चूक असल्यास ती त्वरित दुरुस्त करा. तर असे अनेक शेतकरी आहेत ज्यांच्या बँक खात्यात काही अडचणींमुळे पीएम किसान सन्मान निधीचे पैसे वेळेवर येत नाहीत, अशा लोकांनीही त्यांच्या बँक खात्यातील तांत्रिक चुका लवकरात लवकर दुरुस्त कराव्यात.

पती-पत्नी दोघांच्याही खात्यात पैसे येतील का?

पती-पत्नी दोघेही शेती करत असतील तर पीएम किसान सन्मान निधीचा 14वा हप्ता त्यांच्या खात्यात येईल का, हा अनेकांचा प्रश्न आहे. तुम्हीही असा विचार करत असाल तर थांबा. कारण एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळतो. दुसरीकडे, फसवणूक करून किसान सन्मान निधीचे पैसे खाण्याची चूक केली असेल, तर तुम्हाला पोलिस खटल्यालाही सामोरे जावे लागू शकते.