
Motivational Quotes In Marathi: ज्या व्यक्तीचे विचार सुंदर असतात, त्यांना कुठेही कधीही पराभूत केले जात नाही, यश हे निश्चित आहे. अफाट कष्ट, कर्म आणि योग्य अनुभव ज्ञानाशिवाय कोणीही यश प्राप्त करू शकत नाही. यश मिळविण्यासाठी आपले मन आणि विचारही शुद्ध असले पाहिजे आहेत.
क्र. | सुविचार मराठी |
---|---|
1 | यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला. |
2 | आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते. |
3 | कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते. |
4 | यश हे सोपे कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते, पण समाधान हे महाकठीण असते, कारण त्याला मनाचीच परवानगी लागते. |
5 | तुमचा आजचा संघर्ष हा तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. त्यामुळे तुम्ही तुमचे विचार बदला म्हणजे तुमचे आयुष्य बदलेल. |
6 | निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका, कारण आपलं ध्येय सध्या होताच निंदा करणाऱ्यांची मतं बदलतात. |
7 | नवीन विचार तर दररोज येत असतात पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे. |
8 | तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्कीच समजा तुमची प्रगती होत आहे. |
9 | रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे दोन पर्याय असतात. स्वप्न बघत परत झोपा नाहीतर त्या स्वप्नांच्या मागे लागा. |
10 | आपली सर्वात मोठी चूक म्हणजे हार मानणं. यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे प्रत्येकवेळी अजून एकदा प्रयत्न करणे हाच आहे हे कायम लक्षात ठेवा. |
11 | प्रत्येक दुःख हे आपल्याला एक नवा धडा शिकवते आणि प्रत्येक शिकलेला धडा हा माणसाला बदलतो. |
12 | लोक तुमची स्तुती करोत वा निंदा, तुमचं लक्ष्य तुमच्यावर कृपा करो वा न करो, तुमचा मृत्यू आज होवो वा उद्या, आपल्या मार्गावरून कधीही भटकू नका. |
13 | ग्रंथ हेच आपले गुरु. |
14 | उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमचं लक्ष्य प्राप्त करत नाही. |
15 | खरा मित्र आपली पुस्तके होय. |
सुविचार हे मानवांना प्रेरणा देतात आणि त्यांच्या पद्याची पायरी बनून त्यांच्या जीवनात एक मायम बनतात आणि विचारा प्रदान करतात. भगवतगीता मध्ये देखील उपदेश केला आहे की, एखादी व्यक्ती काम करत असतानाच कर्म श्रेष्ठ होते, त्या कर्माचे फल त्याला मिळते. ज्यांना यश मिळवायचे आहे, ते लहानश्या संकटांची भीती कधीच बाळगत नाही.
16 | जितका मोठा संघर्ष असेल तितकेच तुमचं यश शानदार असेल. |
17 | जसे सोने तप्त केल्याने शुद्ध होते, तसे पश्चातापाने मन पवित्र होते. |
18 | काळ हे फार मोठे औषध आहे, मोठमोठ्या जखमाही काळाच्या मलमपट्याने बर्या होतात. |
19 | कलेची पारंबी माणसाला बळ देते. |
20 | माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात. एक म्हणजे वाचलेली पुस्तके आणि दुसरी भेटलेली माणसे. |
21 | यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे. |
22 | डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही, भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत. |
23 | मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो. |
24 | माणसाचं छोटे दु:ख हे जगाच्या मोठ्या दु:खात मिसळून गेलं की त्याला खरोखरीच सुखाची चव येते. |
25 | माणसानं राजहंसासारखं असावं. आपल्याला जे पटेल तेच घ्यावं, नाही ते सोडून द्यावं. |
26 | काम साध्य होईपर्यंत अडचणींना तोंड द्यावेच |
27 | मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ. |
28 | रोपाला खतपाणी दिल्याने त्याचा वृक्ष बनतो. तसेच मुलावर संस्कार केले तर त्याचा विकास होतो. |
29 | गुणांचं कौतुक उशीरा होतं; पण होतं. |
30 | गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही. |
जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात
31 | आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा. |
32 | विचार असे मांडा कि तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे. |
33 | तुम्ही जगा इतकं की आयुष्य कमी पडेल आणि हसा इतके की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भागच पडेल. |
34 | विश्वासच नसेल तर कोणतंही नातं टिकत नाही. |
35 | स्वतः चा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत. |
36 | कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरी संयम राखणे हेच शौर्याचे लक्षण आहे. |
37 | कोणतेही उद्दिष्ट मेहनती शिवाय साध्य होत नसते. |
38 | मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणसं हवीत कारण, ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपणूक ही आयुष्यभरासाठी |
39 | जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका कधी चुकून डोळ्यांत दोन अश्रू आले तर ते पुसायला किती जण येतात ते मोजा कारण ते जास्त महत्त्वाचं आहे |
40 | तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा |
41 | कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही. आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही |
42 | जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात |
43 | आपण पाहत असलेली आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात |
44 | जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा. चुकाल तेव्हा माफी मागा, अन कुणी चुकलं तर माफ करा |
45 | स्वप्न पाहतच असालं तर मोठीच पाहा. लहान कशाला? कारण मोठी स्वप्नेच माणसाच रक्त ढवळू शकतात |
मराठी सुविचार नेहमीच आपल्याला विचार करायला प्रवृत्त करतात. आपली कृती ही आपल्या विचारांवरच अवलंबून असते.
46 | आयुष्यात खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान व्हायचे असेल तर एकट्यानेच लढायला शिका. |
47 | जर तुम्हाला तणाव हाताळता आला नाही तर यशही हाताळता येणार नाही. |
48 | प्रत्येक दिवस हा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी मिळालेली नवी संधी आहे हेच समजा. |
49 | जोपर्यंत जीवन आहे, तोपर्यंत शिका. कारण अनुभव हा जगातील सर्वश्रेष्ठ शिक्षक आहे. |
50 | आयुष्यात समस्या असतील तरच तुम्ही यशाचा आनंद घेऊ शकाल हे खरं आहे. |
51 | पैशावर विश्वास देऊ नये. विश्वासावर पैसा द्यावा. |
52 | मानवता हाच खरा श्रेष्ठ धर्म होय. देव हा दगडात नसून माणूसकीत आहे. |
53 | जसे काठीने पाणी तोडता येत नाही त्याप्रमाणे रक्ताची नाती तोडून तोडता येत नाहीत. |
54 | पैशाने मिळविलेल्या प्रेमापेक्षा रक्ताच्या नात्याचे रेशमी प्रेमपाश हे अधिक लवचिक असतात. |
55 | विजेच्या लखलखाटापेक्षा समईची शितलता मनाला आल्हाद देते. |
56 | प्रेम हे चंद्रासारखे शितल असते. |
57 | मुलांवर प्रेम करा पण दुर्गुण पाठीमागे घालू नका. |
58 | जे झालं त्याचा विचार करू नका; जे होणार आहे त्याचा विचार करा |
59 | ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं |
60 | खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या अधिक जवळ आलो |