75 वर्षात महाराष्ट्राने भारताला दिलेले खेळाडू

WhatsApp Group

महाराष्ट्राने खेळामध्ये आजपर्यंत अनेक हिरे दिले आहेत अन्‌ इथुन पुढेही देत राहील. महाराष्ट्राने घडवलेले काही उत्कृष्ट खेळाडू यांच्याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. 

सचिन तेंडुलकर – जन्म: 24 एप्रिल, 1973, मुंबई 

सचिन तेंडुलकरचा जन्म 24 एप्रिल 1976 मध्ये मुंबईमध्ये एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात झाला. सचिन तेंडुलकर हा क्रिकेटविश्वात डॉन ब्रॅडमन याच्यानंतर जागतिक स्तरावर सर्वोत्तम मानला जाणारा माजी भारतीय क्रिकेटपटू आहे. इ.स. 2002 मध्ये आपल्या कारकीर्दीच्या बाराव्या वर्षीच, विस्डेनने डॉन ब्रॅडमन याच्यानंतर सर्व कालिक दुसरा सर्वोत्तम कसोटी फलंदाज म्हणून तर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील व्हिव रिचर्ड्स याच्यानंतरचा दुसरा सर्व कालिक सर्वोत्तम फलंदाज म्हणून सचिन तेंडुलकर यांनची निवड केली होती. पद्मविभूषण आणि राजीव गांधी खेलरत्‍न या पुरस्कारांनी तो सन्मानित केला आहे. सचिनला भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला. हा सन्मान त्यांना त्याच्या क्रिकेट मधील निवृत्तीच्या दिवशी जाहीर झाला.

खाशाबा जाधव – जन्म: 15 जानेवारी 1926, सातारा 

खाशाबा जाधव हे ऑलिंपिक पदक विजेते मराठी, भारतीय कुस्तीगीर होते. इ.स. 1952 सालातल्या ऑलिंपिकमध्ये त्यांनी जिंकलेले फ्रीस्टाइल कुस्तीतले कांस्यपदक हे भारतासाठी स्वातंत्र्योत्तर काळातले पहिले वैयक्तिक पदक होते. खाशाबा जाधव यांचा जन्म 15 जानेवारी 1926 रोजी महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यामध्ये कराड तालुक्यातील गोळेश्वर खेड्यात झाला. कुस्तीच्या खेळात त्यांची ख्याती होती. ऑलिंपिकमध्ये पदक जिंकणारे पहिले भारतीय खेळाडू होते. सन 1900 मध्ये नॉर्मन प्रीतचंद यांनी वैयक्तिक खेळात दोन सिल्व्हर पदंके जिंकली होती. त्यानंतर ऑलिंपिकमध्ये पदक जिंकणारे खाशाबा जाधव हे एकमेव खेळाडू होते.

राही सरनोबत – जन्म: 30 ऑक्टोबर 1990, कोल्हापूर 

राही जीवन सरनोबत ही एक भारतीय नेमबाज आहे जी 25 मीटर पिस्तुल नेमबाजी स्पर्धेत भाग घेते. तिने भारतातील पुणे येथे 2008 मध्ये झालेल्या राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेत पहिले सुवर्णपदक जिंकले .

विरधवल खाडे – जन्म: 29 ऑगस्ट 1991, कोल्हापूर 

वीरधवल खाडे हा ऑलिंपिक स्पर्धांत भाग घेणारा एक मराठी जलतरणपटू आहे. वयाच्या सतराव्या वर्षी तो पहिल्यांदा ऑलिंपिकसाठी निवडला गेला. त्यावेळी तो वयाने सर्वात लहान जलतरणपटू होता. खाडेचे सर्व शिक्षण कोल्हापुरात झाले. न्यू मॉडेल कॉलेज येथे त्याने महाविद्यालयीन शिक्षण घेतले. खाडेला वयाच्या ४थ्या वर्षी वडिलांनी पोहण्यास शिकविले. त्याने कोल्हापूरमधील जलतरण शिक्षण शिबिरांत सहभाग घेतला. वयाच्या 9व्या वर्षी त्याने विविध स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली.२००६मधील आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये खाडेने तीन नवीन विक्रम नोंदवीत सहा सुवर्णपदके जिंकली

अजिंक्य रहाणे – जन्म: 6 जून 1988, मुंबई 

अजिंक्य रहाणे हा भारतीय क्रिकेटपटू आहे. तो भारतीय क्रिकेट संघामध्ये मधल्या फळीतील फलंदाज म्हणून खेळतो. कसोटी सामन्यांमध्ये त्याने भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे. अजिंक्य रहाणे याचा जन्म 6 जून 1988 रोजी आश्वी खुर्द, जिल्हा अहमदनगर (महाराष्ट्र) येथे झाला. संगमनेर तालुक्यातील चंदनपुरी या खेड्यात राहणारे मराठा श्री मधुकर बाबुराव रहाणे व सुजाता रहाणे हे त्याचे आई – वडील! जेव्हा रहाणे 7 वर्षाचा होता तेव्हा त्याचे वडील त्याला डोंबिवली येथे मॅट विकेट वरील प्रशिक्षणासाठी घेऊन गेले होते. पण तेथे त्याला योग्य प्रशिक्षण मिळाले नाही. माजी भारतीय कसोटी पटू प्रवीण आमरे यांचेकडे त्याने वयाच्या 17 वर्षापर्यंत प्रशिक्षण घेतले.

धनराज पिल्ले – जन्म: 16 जुलै, १९६८, पुणे 

धनराज पिल्ले हे खडकी-पुणे येथे राहणारे एक हॉकी खेळाडू आहेत. धनराज पिल्ले यांचा जन्म सामान्य कुटुंबात झाला पण आपल्या जिद्दीच्या व कौशल्याच्या जोरावर ते भारतीय हॉकी संघाच्या कर्णधारपदापर्यंत पोचले..

केदार जाधव – जन्म:26 मार्च 1985, पुणे 

केदार जाधव हा मुळात सोलापूरमधील माढा तालुक्यातील जाधववाडी येथील आहे. वडिल महादेव आणि आई मंदाकिनी यांच्या 4 मुलांपैकी तो सर्वात लहान मुलगा आहे. त्याचे वडील हे महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रीसिटी बोर्डचे कर्मचारी होते. केदारने मार्च 2010मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध दिल्ली डेअरडेविल्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते.

सुनील गावसकर – जन्म: 10 जुलै 1949, मुंबई 

सुनील मनोहर गावसकर यांचा जन्म हा भारतीय पुरुष क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला फलंदाज आहे. कसोटी सामन्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या इतिहासातील सर्वोत्तम आघाडीचा फलंदाज म्हणून त्यांना गणले जाते.

संग्राम चौगुले – जन्म: 28 डिसेंबर 1979, कोल्हापूर 

संग्राम चौगुले हा मूळचा महाराष्ट्रातील कोल्हापूरचा आहे. संग्रामचे आई आणि वडील शिक्षक होते. आई-वडिलांच्या मिळकतीने 6 जणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह महत्प्रयासाने होत होता. संग्रामने गावातील शाळेतून सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केले आणि 12वी नंतर पॉलिटेक्निक कॉलेज, बहादूरगड येथून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (इंजिनिअरिंग) मध्ये डिप्लोमा केला. त्यानंतर पुण्याच्या मॉडर्न कॉलेजमध्ये बीएला प्रवेश घेतला. पुण्यात शिकत असताना संग्राम चौघुले यांचा शरीरनिर्मितीकडे कल वाढला. ‘महाराष्ट्र आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत’ भाग घेत त्यांनी पहिल्यांदा ‘मराठा श्री’ हा किताब पटकावला. अवघ्या काही वर्षांतच संग्रामने कठोर परिश्रम आणि समर्पणाने संपूर्ण महाराष्ट्रात नाव कमावले आणि ‘आस्था सांगली’, ‘द ग्रेट मराठा श्री’ आणि ‘पुणे श्री’ यांसारख्या प्रतिष्ठित पदव्या जिंकल्या. 2009 मध्ये ‘महाराष्ट्र श्री’ स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून संग्राम महाराष्ट्राचा सर्वोत्तम शरीरसौष्ठवपटू ठरला. 2010 मध्ये तो ‘मिस्टर इंडिया’ ठरला. त्याच वर्षी बहरीन येथे होणाऱ्या ‘एशियन बॉडी बिल्डर्स चॅम्पियनशिप’मध्ये संग्रामने 5 वा क्रमांक मिळवला.

अजित आगरकर – जन्म: 4 डिसेंबर 1977, मुंबई 

अजित आगरकर याने शारदाश्रम विद्यामंदीर विद्यालय या क्रिकेटसाठीच्या प्रसिद्ध विद्यालयात शिक्षण घेतले. प्रविण आम्रे, सचिन तेंडूलकर आणि विनोद कांबळी अशा क्रिकेटपटूंना प्रशिक्षण देणाऱ्या रमाकांत आचरेकर यांच्याकडून त्याने क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले होते. अजितचे वडील बालचंद्र यांच्या इच्छेखातीर त्याने क्रिकेटची सुरुवात फलंजादीने केली. मात्र, पुढे तो चांगला गोलंदाजही बनला. विद्यालयीन क्रिकेटमध्ये त्याने जाईल्स शिल्ड स्पर्धेत वयाच्या १५ व्या वर्षी त्रिशतक ठोकत आपले कौशल्याही दाखवून दिले होते.

स्मृती मंधाना – जन्म: 18 जुलै 1996, मुंबई 

स्मृतीचा जन्म 18 जुलै 1996 रोजी मुंबईत झाला. तिच्या आईचे नाव स्मिता मंधाना आणि वडीलाचे नाव श्रीनिवास मंधाना आहे. तिचे वडील, माजी जिल्हा खेळाडू होते. त्यांना त्यांची मुले श्रावण आणि स्मृती यांच्याद्वारे त्यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पुर्ण होताना पाहण्याची इच्छा होती. ती दोन वर्षांची असताना तिचे कुटुंब सांगलीला रहायला गेले. तिच्या भावाला महाराष्ट्र राज्य 16 वर्षांखालील स्पर्धेत खेळताना पाहून तिला क्रिकेट घेण्याची प्रेरणा मिळाली. वयाच्या 9 व्या वर्षी तिची महाराष्ट्राच्या 15 वर्षांखालील संघात निवड झाली.

तेजस्विनी सावंत – जन्म:12 सप्टेंबर 1980, कोल्हापूर 

तेजस्विनी सावंत ही जागतिक विजेतेपद मिळवणारी महाराष्ट्रातल्या कोल्हापूर शहरातली एक भारतीय महिला नेमबाज आहे. तिचे वडील भारताच्या नौदलात अधिकारी होते. इस्लामाबादमध्ये 2004 साली झालेल्या 9व्या दक्षिण आशिया क्रीडा महासंघ खेळांत तेजस्विनीने भारताचे प्रतिनिधित्व केले आणि भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. त्यानंतर राष्ट्रीय विजेतेपद स्पर्धेत आशियाई खेळातील सुवर्णपदक विजेती अंजली वेदपाठक भागवत आणि जागतिक विक्रमाची नोंद असलेली सुमा शिरूर यांना मागे टाकत तिने पाच सुवर्णपदके, सहा रजतपदके आणि पाच कांस्यपदकांची कमाई केली. 2006 च्या मेलबोर्न राष्ट्रकुल खेळांत महिलांच्या 10 मीटर एर रायफल सिंगल्स आणि महिलांच्या 10 मीटर एर रायफल दुहेरी प्रकारात अवनीत कौर सिद्धूसोबत तिने सुवर्णपदकांची कमाई केली. जर्मनीत म्युनिख येथे 2009 साली झालेल्या आयएसएसएफ विश्वकरंडक स्पर्धेत 50 मीटर रायफल-थ्री पोझिशन्स प्रकारात तेजस्विनीने कांस्यपदक पटकावले. त्यानंतर म्युनिखमध्येच 50 मीटर रायफलप्रोन इव्हेंटमध्ये तिने 8 ऑगस्ट 2010 रोजी जागतिक विजेतेपद प्राप्त केले. 50 मीटर रायफलप्रोन प्रकारात जागतिक विक्रमाची बरोबरी करीत विजेतेपद मिळवणारी तेजस्विनी ही पहिली भारतीय महिला नेमबाज आहे.

धवल कुलकर्णी – जन्म: 10 डिसेंबर 1988, मुंबई 

मुंबईकर धवल कुलकर्णी 17 वर्षांखालील विजय मर्चंट ट्रॉफीत मुंबईकडून खेळणारा पहिल्यांदा प्रसिद्धीला आला. कुलकर्णी 2009च्या रणजी ट्रॉफी हंगामात संपूर्ण हंगामात 22.02च्या सरासरीने 49 विकेट्स घेत मुंबई संघातील सर्वाधिक विकेट्स घेणारा क्रिकेटपटू ठरला.

दिलीप वेंगसरकर – जन्म: 6 एप्रिल 1956, राजापूर 

दिलीप वेंगसरकर यांचा जन्म 6 एप्रिल 1956 रोजी महाराष्ट्र राज्यात राजापूर येथे झाला. भारतीय क्रिकेट खेळाडू आणि व्यवस्थापक म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांच्या काळात अतिशय वैशिष्ट्यपूर्ण शैली असलेले फलंदाज म्हणून ते प्रसिद्ध होते.