Konkan Travel Plan: उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकणात जाण्याचा प्लान करताय? मग ‘या’ ठिकाणी नक्की जा!

0
WhatsApp Group

Konkan Travel Plan: सध्या उन्हाळ्याचा सिजन सुरु आहे. उन्हळ्याच्या या कडक उन्हात सगळेच कुठे तरी थंड हवेच्या ठिकाणी जाण्याचा प्लान करतात, तुम्ही देखील अशाच ठिकाणच्या शोधात असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक चांगला पर्याय घेऊन आहोत, कोकण देखील असेच एक ठिकाण आहे, जिथे तुम्ही समुद्रकिनारा, शुद्ध हवा, हिरवागार निसर्ग याचा आनंद घेऊ शकाल. तुम्ही कोकणाला जाण्याचा प्लॅन करत असाल, तर ही 5 ठिकाणे सर्वोत्तम आहेत.

वेंगुर्ला हे अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेलं आहे. मुंबईपासून हे जावपास 520 किलोमीटर अंतर आहे. याठिकाणी असलेल्या समुद्रकिनारी दरवर्षी लाखो भेट देतात. वेंगुर्ला समुद्रकिना-याला अवती-भोवती टेकड्या आहेत.

पुण्याच्या पश्चिमेला सुमारे 192 किमी अंतरावर स्थित, काशीद हे महाराष्ट्राच्या कोकण प्रदेशातील समुद्रकिनारी असलेले शहर आहे. काशीद समुद्रकिनारा अलिबागच्या दक्षिणेस 30 किमी अंतरावर आहे. भातशेती, पर्वत, पांढरे वाळूचे किनारे हे पुणे तसेच मुंबईतील सर्वात लोकप्रिय वीकेंड गेटवे बनवतात. काशीद हे अलिबाग-मुरुड रस्त्यावर वसलेले आहे आणि राज्यातील सर्वोत्तम समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे.

धबधबे कोणत्याही ठिकाणाला सुंदर बनवतात. ताम्हिणी घाटातील सर्वात प्रसिद्ध ठिकाण म्हणजे ताम्हिणी धबधबा. हा धबधबा डोंगराच्या उंचीवरून पडतो, खाली पडणारे पाणी पाहणे किती सुंदर असते हे समजण्यासाठी तुम्हाला येथे भेट द्यावे लागेल. या धबधब्याचा आनंद तुम्हला येथे येऊनच घेता यईल, ताम्हिणी फॉल्स हे तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत मजा करण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. ताम्हिणीला गेलात तर हा धबधबा नक्की बघा.

कोकणातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणजे मालवण, येथे उन्हाळ्याच्या सुट्टीत हजारो पर्यटक भेट द्यायला येतात. महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे ठिकाण समुद्रकिनाऱ्यासाठी लोकप्रिय आहे. तसेच मालवणी खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. अल्फोन्सो आणि मालवणी हापूस यांसारख्या आंब्याच्या विविध जातींसाठीही हे ठिकाण प्रसिद्ध आहे.

दिवेआगर हे महाराष्ट्राच्या कोकण किनार्‍यावर वसलेले एक सुंदर पर्यटन स्थळ आहे, सुमारे 5 किमी लांबीवर पसरलेला हा समुद्रकिनारा महाराष्ट्रातील सर्वात प्रमुख समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. हे मुंबईपासून सुमारे 170 किमी अंतरावर आहे. जर तुम्हाला महाराष्ट्राच्या गजबजाटापासून दूर कुठेतरी आराम करायचा असेल तर हा बीच तुमच्यासाठी योग्य ठिकाण आहे. येथे रोमिंगसोबतच तुम्ही सर्फिंग आणि स्कूबा डायव्हिंगचाही आनंद घेऊ शकता. इथून सूर्यास्ताचे अप्रतिम नजारे पाहणे हा स्वतःचाच आनंद आहे असे म्हणतात. याशिवाय दिवेआगरमधील श्रीवर्धन बीच आणि कोंदिवली बीचलाही तुम्ही भेट देऊ शकता.