कॅनडात विमान कोसळले, दोन भारतीय वैमानिकांसह तिघांचा मृत्यू

WhatsApp Group

कॅनडातून एक अत्यंत क्लेशदायक बातमी समोर आली आहे. व्हँकुव्हरजवळील चिलीवॅकमध्ये एक छोटे विमान कोसळले आहे. या अपघातात दोन भारतीय प्रशिक्षणार्थी वैमानिकांसह तिघांचा मृत्यू झाला. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान परिसरातील एका झाडावर आदळल्यानंतर अपघात झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मृत्यू झालेले दोन भारतीय पायलट मुंबईचे रहिवासी होते. अभय गद्रू आणि यश विजय रामुगडे अशी विमान अपघातात प्राण गमावलेल्या प्रशिक्षणार्थी वैमानिकांची नावे आहेत.

स्थानिक वेळेनुसार दुपारी 2 वाजता (2100 GMT) विमानतळापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या एका मोटेलजवळ पायपर पीए-34 सेनेका हे दुहेरी इंजिन असलेले हलके विमान क्रॅश झाले, असे एका स्थानिक अधिकाऱ्याने अपघातानंतर सांगितले. या अपघातात पायलटसह तिघांचा मृत्यू झाला. मात्र, अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

कॅनडात हा विमान अपघात कसा झाला याबाबत सध्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही. म्हणजेच अपघातांची कारणे शोधली जात आहेत. अपघातानंतर मृतांच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आहे. अपघाताचा बळी ठरलेले विमान पाइपर पीए-34 सेनेका हे दुहेरी इंजिन असलेले हलके विमान असल्याचे सांगितले जात आहे.

कॅनडाच्या ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डाच्या म्हणण्यानुसार, एक तपास पथक घटनास्थळी पाठवण्यात आले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. विमान अपघाताचे कारण लवकरच कळेल. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या या परिसरात कोणी जखमी झाल्याची माहिती मिळालेली नाही.