
प्रियंका चोप्रा Priyanka Chopra भलेही हॉलिवूडकडे वळली असेल पण तिच्याशी संबंधित बातम्या जाणून घेण्यासाठी भारतीय चाहते नेहमीच उत्सुक असतात. प्रियांकाने जेव्हापासून तिची मुलगी मालती मेरीबद्दल घोषणा केली तेव्हापासून चाहत्यांना तिच्या मुलीला पाहण्याची इच्छा होती. आता अखेर प्रियंका ने सगळ्यांना मुलीचा चेहरा दाखवला आहे. सोमवारी निक जोनास आणि त्याच्या भावांना ‘हॉलीवूड वॉक ऑफ फेम स्टार’ पुरस्कार मिळाला. या कार्यक्रमादरम्यान प्रियांकाने आपल्या मुलीची सर्वांशी ओळख करून दिली.
या फोटोंमध्ये मालती खूपच क्यूट दिसत आहे. या फोटोंमध्ये मालती प्रियांकाची मुलगी तिच्या मांडीवर दिसत आहे. हे फोटो पाहून चाहते खूश आहेत. आजपर्यंत अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या सर्व फोटोंमध्ये तिने आपला चेहरा इमोजीने लपवला होता. पण आता एका कार्यक्रमातून निक जोनासच्या मुलीचा चेहरा समोर आला आहे.
या फोटोंमध्ये प्रियंका तपकिरी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे, तर मालतीने ऑफ-व्हाइट विंटर स्वेटर घातलेला आहे. यासोबतच एक मोठा हेअरबँडही लावला आहे. प्रियंका चोप्राची मुलगी खरच खूप सुंदर आहे. इतकेच नाही तर प्रियांकाने मुलगी मालतीसोबतचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केला आहे. जेव्हा निक जोनासला हॉलिवूड वॉक ऑफ फेममध्ये स्टार मिळाला तेव्हा तो स्टेजवरून मालतीबद्दल बोलला, त्यादरम्यान प्रियांकाने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला होता. बेबी मालतीचा हा गोंडस रूप केवळ बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडच्या चाहत्यांनाही आवडला आहे.