
मुंबई – मनसे अध्यक्ष आणि शिवसेनेतील बंड केलेले नेते एकनाथ शिंदे यांच्यात फोनवरुन चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. राज ठाकरे यांना काल रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी फोनवरुन राज ठाकरे यांच्या तब्येतीची आणि राज्यातील राजकीय परिस्थिती संबंधी चर्चा केली असल्याचे सांगण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंडखोरी केली आहे, सध्या एकनाथ शिंदे यांना वेगळा गट स्थापन करणार आहेत, त्यामुळे ही फोनवरील चर्चा राजकीय वर्तुळात महत्वाची मानली जात आहे.