
मुंबई – बदलणाऱ्या जागतिक परिस्थितीमध्ये कच्च्या तेलाच्या किमतीत (Crude Oil Price) खूप चढ-उतार होत आहेत. दोन-तीन दिवसांपूर्वी क्रूडची किंमत, जी प्रति बॅरल 115 डॉलरच्या वर होती, ती सध्या 111 डॉलरच्या जवळ आहे. तेल उत्पादक देशांची संघटना ओपेकने पुरवठा वाढवण्याचे संकेत दिले आहेत. मंदीच्या भीतीने इंधनाचा (Fuel) वापर कमी होणे अपेक्षित आहे. या कारणांमुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 111 डॉलरच्या आसपास घसरली आहे.
दरम्यान, सरकारी तेल कंपन्यांनी शनिवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर (Petrol Diesel Prices) जाहीर केले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतीमध्ये आजही कंपन्यांनी कोणताही बदल केलेला नाही. दिल्लीमध्ये अजूनही पेट्रोल 96.72 रुपये प्रतिलिटरने विकल जात आहे. सरकारी रिफायनरी कंपन्यांना रशियाकडून स्वस्त तेल मिळत आहे. त्यामुळेच 6 एप्रिलपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.
राज्यातील प्रमुख शहरांतील दर
- मुंबई – पेट्रोल 111.35 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लीटर
- पुणे – पेट्रोल 111.10 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 95.58 रुपये प्रति लीटर
- ठाणे- पेट्रोल 110.78 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 95.25 रुपये प्रति लीटर
- नाशिक- पेट्रोल 111.22 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 95.70 रुपये प्रति लीटर
- नागपूर- पेट्रोल 111.65 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 96.14 रुपये प्रति लीटर
- औरंगाबाद- पेट्रोल 111.70 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 96.16 रुपये प्रति लीटर
- जळगाव- पेट्रोल 112.22 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 96.67 रुपये प्रति लीटर
- कोल्हापूर- पेट्रोल 111.02 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 95.54 रुपये प्रति लीटर