तब्बल १३७ दिवसांनी पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढविल्यानंतर आज सामान्यांवर आणखी एक महागाईचा आगडोंब कोसळला आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये ८० पैसे प्रति लीटर एवढी वाढ झाली आहे. आजपासून हे नवे दर लागू झाले आहेत. युक्रेन-रशिया युद्धामुळे इंधनाच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. आता आजपासून दररोज पेट्रोल, डिझेलचे दर वाढणार आहेत. तसेच आधीचा विक्रम देखील मोडण्याची शक्यता आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरांना आग लागलेली असताना दुसरीकडे एलपीजी सिलिंडरच्या किंमतीमध्ये देखील वाढ झाली आहे.
14.2 kg Domestic cooking gas LPG price hiked by Rs 50 per cylinder. Will now cost Rs 949.50 effective from today: Sources pic.twitter.com/jYvh0RWZG5
— ANI (@ANI) March 22, 2022
इंडियन ऑईलनुसार घरगुती गॅस सिलिंडरच्या दरामध्ये ५० रुपये प्रति सिलिंडर दरवाढ झाली आहे. या नव्या किंमती आजपासूनच लागू होणार आहेत. ही दरवाढ १४.२ किलोच्या सिलिंडवर करण्य़ात आली आहे. यामुळे आजपासून या सिलिंडरच्या किंमती ९४९.५० प्रति सिलिंडर असणार आहेत.