Petrol Dealers Strike Today: घराबाहेर पडण्याआधी ही बातमी नक्की वाचा…आज पेट्रोल डिझेल पंप डिलर्सचा संप, पेट्रोल-डिझेलची टंचाई!

राज्यातील वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. घराबाहेर पडण्याआधी गाडीत पेट्रोल आहे की नाही, हे बघून घ्या अन्यथा तुमच्यावर गाडी ढकलण्याची वेळ येऊ शकते. इंधन दरवाढीमुळे (Petrol Diesel Price) सर्वसामान्यांच्या नाकी नऊ आणले असताना आज, 31 मे रोजी पेट्रोल पंप डीलर्स संपाचे हत्यार उपसले आहे.
महाराष्ट्रासह इतरही राज्यामध्ये पेट्रोल डिझेल पंप डिलर्सनं संपाची हाक दिली आहे. कमिशनमध्ये वाढ करण्याच्या मागणीसाठी हा संप आहे. आज पेट्रोल डिझेलची खरेदी न करण्याचा निर्णय डिलर्सनी घेतला आहे. (Petrol Diesel Price todays rates) त्यामुळे पेट्रोल-डिझेलची टंचाई जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सन 2017 पासून कमिशनमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही, अशी तक्रार पेट्रोल-डिझेलच्या करत त्यांनी हा संप पुकारला आहे. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी पेट्रोल डिझेलवरील करात कपात केली, रातोरात इंधनदरही कमी केले. सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला. पण, आम्हाला मोठा आर्थिक फटका बसला, असं पेट्रोल पंपचालकांचे म्हणणे आहे.