मुंबई – रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु झालेल्या युद्धाचे पडसाद आता संपूर्ण जगभरात उमटत आहेत. रशियाने युक्रेनवर हल्ला करताच आंतराराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलांच्या किंमतीत झपाट्याने वाढल्याचे पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किंमती १०३ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या आहेत. याचा मोठा परिणाम आता पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर झाला आहे. भारतात मागच्या वर्षभरापासून इंधानाच्या किंमती आधीच गगनाला भिडल्या होत्या. मात्र आता युद्ध सुरू झाल्यानंतर इंधनाच्या किंमतींमध्ये चांगलाच विस्फोट झाल्याचे पाहायला मिळत आहे.
सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या नव्या किंमती जारी केल्या आहेत. देशात इंधनाच्या किंमतीमध्ये वाढ झाली असली तरी राज्याला आज दिलासा मिळाला आहे. कारण राज्यातील पेट्रोल डिझेलच्या किंमतीमध्ये आज कोणताही बदल झालेला नाही. मात्र महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामधील पेट्रोलच्या किंमती या १०० रुपयांच्या पार गेल्या आहेत.
मुंबई, पुणे ते नाशिक पर्यंत जिल्ह्यांमधील पेट्रोल डिझेलचे आजचे दर जाणून घ्या.
- मुंबई: पेट्रोल – १०९.९८ रुपये प्रति लीटर, डिझेल – ९४.१४ रुपये प्रति लीटर
- ठाणे: पेट्रोल – १०९.५१ रुपये प्रति लीटर, डिझेल – ९२.२८ रुपये प्रति लीटर
- पुणे: पेट्रोल – १०९.७२ रुपये प्रति लीटर, डिझेल – ९२.५० रुपये प्रति लीटर
- नाशिक: पेट्रोल – ११०.४० रुपये प्रति लीटर, डिझेल – ९३.१६ रुपये प्रति लीटर
- नागपूर: पेट्रोल – ११०.०२ रुपये प्रति लीटर, डिझेल – ९२.८३ रुपये प्रति लीटर
- कोल्हापूर: पेट्रोल – ११०.५३ रुपये प्रति लीटर, डिझेल – ९३.३१ रुपये प्रति लीटर
- अहमदनगर: पेट्रोल – ११०.२६ रुपये प्रति लीटर, डिझेल – ९३.०३ रुपये प्रति लीटर
- अमरावती: पेट्रोल – ११०.१९ रुपये प्रति लीटर, डिझेल – ९२.९९ रुपये प्रति लीटर