BBL 2023: पर्थ स्कॉचर्सने पटकावले बिग बॅश लीगचे जेतेपद

WhatsApp Group

BBL 2023: ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये, पर्थ स्कॉचर्सने बिस्बेन हीटचा पाच गडी राखून पराभव करून पाचव्यांदा ट्रॉफी जिंकली. या विजयासह पर्थ स्कॉचर्स संघ स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ ठरला आहे. बिग बॅश लीगच्या 12व्या हंगामाचा अंतिम सामना पर्थ क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात बिस्बेन हीट संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना बिस्बेन हीट संघाने निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 175 धावा केल्या. प्रत्युत्तरात पर्थ स्कॉचर्स संघाने लक्ष्याचा पाठलाग करताना 19.2 षटकांत 5 गडी गमावून 178 धावा केल्या आणि सामना जिंकला.

पर्थ स्कॉचर्स आता बीबीएलमधील ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी संघ आहे. त्यांनी त्यांचे पाचवे विजेतेपद पटकावले आहे. आणि सिडनी सिक्सर्सला मागे टाकले आहे ज्यांनी 4 विजेतेपद जिंकले आहेत. ते गतविजेते देखील होते आणि दोनदा त्यांच्या विजेतेपदाचे रक्षण करणारा एकमेव संघ बनला. पर्थ संघाने यापूर्वी 2013-14 आणि 2014-15 मध्ये विजेतेपद पटकावले होते.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, पहिल्या डावात ब्रिस्बेन हीटच्या संघाने दमदार सुरुवात केली परंतु 25 धावांवर त्यांची पहिली विकेट गमावली. यानंतर सॅम हेझलेट आणि नॅथन मॅकस्विनी यांनी डाव सांभाळला आणि संघाला 100 धावांच्या पुढे नेले. सॅम हेझलेट 34 धावा करून 104 धावांवर बाद झाला. मॅक्स ब्रायंटने संघाची धावसंख्या झपाट्याने वाढवली पण तो बाद झाल्यानंतर कोणताही फलंदाज विशेष काही करू शकला नाही आणि संघाला १७५ धावांपर्यंत मजल मारता आली.

सामन्याच्या दुसऱ्या डावात पर्थ स्कॉचर्स संघाची सुरुवात स्थिर होती. स्टीफन एस्किनाझी आणि कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट यांनी सुरुवात केली, परंतु ब्रिस्बेनने सामन्यात परतफेड करत दोन्ही सलामीवीरांना 48 धावांवर बाद केले. एका वेळी संघाने 7.5 षटकांत 54 धावांवर 3 विकेट गमावल्या होत्या. पण संघाचा कर्णधार अॅश्टन टर्नर एका टोकाला अडकला. त्याने आव्हानाचा पाठलाग करत अर्धशतक झळकावले. शेवटी निक हॉब्सन आणि कूपर कॉनोली यांनी पर्थला विजय मिळवून दिला.