BBL: सिडनी सिक्सर्सचा पराभव करत पर्थ स्कॉचर्सने चौथ्यांदा पटकावले बीबीएलचे विजेतेपद

WhatsApp Group

पर्थ स्कॉचर्सने बिग बॅश लीगच्या11व्या हंगामाचे विजेतेपद पटकावले आहे. शुक्रवारी झालेल्या अंतिम सामन्यात पर्थने सिडनी सिक्सर्सचा 79 धावांनी पराभव केला. लॉरी इव्हान्स आणि अॅश्टन टर्नर यांच्या अर्धशतकांनी संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

अंतिम फेरीतील पराभवामुळे सिडनी सिक्सर्सचे सलग तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न भंगले. त्याचबरोबर स्कॉर्चर्स संघाने विक्रमी चौथ्यांदा बिग बॅश लीगचे विजेतेपद पटकावले आहे. पर्थने तीन वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या सिडनी सिक्सर्सला मागे टाकले.


172 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सिडनी सिक्सर्सचे फलंदाज सुरुवातीपासूनच आक्रमक फटके खेळण्याचा प्रयत्न करताना दिसले. परिणामी, संपूर्ण संघ 16.2 षटकांत 92 धावांत गारद झाला. डॅनियल ह्यूजने सर्वाधिक 42 धावांची खेळी खेळली. सिडनी सिक्सर्सचे आठ फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत. पर्थ स्कॉचर्ससाठी अँड्र्यू टायने सर्वाधिक तीन आणि जे रिचर्डसनने दोन विकेट्स घेतल्या.