पेपरफ्रायचे सहसंस्थापक अंबरिश मूर्ती यांचे निधन

0
WhatsApp Group

प्रसिद्ध ऑनलाइन फर्निचर कंपनी Pepperfry चे सह-संस्थापक अंबरीश मूर्ती यांचे लेहमध्ये निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने 51 वर्षीय अंबरीश मूर्ती यांनी काल रात्री लेहमध्ये अखेरचा श्वास घेतला. पेपरफ्रायचे दुसरे सह-संस्थापक आशिष सिंह यांनी ट्विटद्वारे दुःखद बातमी दिली की त्यांनी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे मित्र आणि मार्गदर्शक अंबरीश मूर्ती गमावले आहेत.

आशिष सिंह यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “माझा मित्र, गुरू, भाऊ, सोलमेट अंबरीश मूर्ती यापुढे नाही हे कळवताना अतिशय दुःख होत आहे. काल रात्री त्यांना लेहमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने गमावले. त्यांच्यासाठी प्रार्थना करा.