लग्नानंतर जोडीदाराची फसवणूक करण्यात ‘या’ देशातील लोक आहेत आघाडीवर!

WhatsApp Group

लग्नानंतर जोडीदाराची फसवणूक करण्याच्या बाबतीत आयर्लंडचे लोक संपूर्ण जगामध्ये आघाडीवर आहेत. कॅनडातील एका विवाहित डेटिंग साइटच्या सर्वेक्षणात हा खुलासा झाला आहे. अभ्यासानुसार, आयर्लंडमधील पाचपैकी एक लोक म्हणजेच 20 टक्के लोक त्यांच्या जोडीदाराची फसवणूक करतो. फसवणुकीच्या बाबतीत जर्मनी दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथील 13 टक्के लोकांनी कबूल केले की ते दररोज आपल्या जोडीदाराची फसवणूक करतात. या जागतिक अभ्यासात कोलंबिया 8 टक्क्यांसह तिसऱ्या, फ्रान्स 6 टक्क्यांसह  चौथ्या आणि यूके 5 टक्क्यांसह पाचव्या स्थानावर आहे.

विवाहित डेटिंग साइटने केलेल्या सर्वेक्षणात बहुतेक लोकांनी कबूल केले की त्यांच्या जोडीदाराच्या अफेअरबद्दल माहित असतानाही ते त्यांच्या जोडीदाराला माफ करतात. आकडेवारीनुसार, फसवणूक झाल्यानंतर, बहुतेक स्त्रिया त्यांच्या जोडीदारांवर पूर्वीसारखा आंधळा विश्वास ठेवत नाहीत. सर्वेक्षणात, जेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनरला त्याच्या अफेअरसाठी माफ कराल का असे विचारले असता 86 टक्के पुरुषांनी होय तर 82 टक्के स्त्रिया नाही असे उत्तर दिले आहे. स्त्रिया आणि पुरुषांमधील वैचारिक फरकांवर मानसशास्त्रज्ञांचीही मते भिन्न आहेत.

मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात की पुरुष त्यांच्या जोडीदाराच्या शारीरिक आसक्तीकडे जास्त लक्ष देतात जेव्हा त्यांच्याशी प्रेमसंबंध असल्याचे निदान होते, तर महिलांना त्यांच्या जोडीदाराची इतर स्त्रीशी किती भावनिक जोड आहे हे जाणून घेण्यात अधिक रस असतो. स्त्रिया आपल्या जोडीदाराची भावनिक फसवणूक झाल्यावर सहजासहजी माफ करू शकत नाहीत. अभ्यासानुसार, जगभरात लॉकडाऊनचे नियम जारी असतानाही प्रेम आणि फसवणुकीची ही प्रकरणे सातत्याने समोर आली होती.

सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी बहुतेकांनी कबूल केले की ते एका महिन्यात दोन वेगवेगळ्या लोकांशी संबंध ठेवतात. त्याचवेळी, अनेकांनी असेही सांगितले की त्यांचे त्यांच्या गुप्त जोडीदाराशी कोणत्याही प्रकारचे लैंगिक संबंध नाहीत. डेटिंग साइटच्या 3000 सदस्यांवर हा जागतिक अभ्यास करण्यात आला आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाईव्ह न्यूज अपडेटसाठी आम्हाला Facebook वर लाईक करा किंवा Twitter वर फॉलो करा.