पायल रोहतगीने ‘धाकड’ च्या कलेक्शनवरून कंगना राणौतची उडवली खिल्ली

WhatsApp Group

आपल्या बिनधास्त स्वभावामुळे अभिनेत्री पायल रोहतगी नेहमीच चर्चेत राहिली आहे. अलिकडेच ती कंगना रणौतच्या ‘लॉक अप’ रिअलिटी शोमध्ये सहभागी झाली होती. पायल या शोची उपविजेती ठरली. तर मुनव्वर फारूखी या शोचा विजेता ठरला होता. शो संपल्यानंतर पायलने दावा केला होता की, कंगनानं मुनव्वरला पाठिंबा दिल्यामुळेच तो शोचा विजेता होऊ शकला. यासोबतच तिने कंगनावर टीका देखील केली होती.

काही दिवसांपूर्वीच कंगनाचा ‘धाकड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. पण बॉक्स ऑफिसवर मात्र या चित्रपटाला फारशी चांगली कमाई करता आली नाही. आता याच मुद्द्यावरून पायलने पुन्हा एकदा कंगनावर निशाणा साधला असून तिनं इन्स्टाग्राम पोस्टमध्ये कंगनाची खिल्ली उडवली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Team Payal Rohatgi (@payalrohatgi)

आपल्या पोस्टमध्ये तिने लिहिलं, “दुःखद, ही सगळी कर्मांची फळं आहेत. ज्याला १८ लाख वोट मिळाले. ना त्याने चित्रपटाचे प्रमोशन केळे ना त्याचे नकली वोटर्स चित्रपट पाहण्यासाठी आले. सीता मातेवर चित्रपट निर्मिती करणार आहे आणि त्यात सीता मातेची खिल्ली उडवणाऱ्याला कदाचित चित्रपटात भूमिका देखील मिळेल. कारण त्याला आपली ऑब्जेक्टिव्हिटी दाखवायची आहे.”

ऐवढंच राहिलं होतं! Urfi Javed ने प्लास्टिकनंतर घातला 20 किलो वजनाचा काचेचा ड्रेस