पटना पायरेट्स आणि दबंग दिल्ली खेळणार प्रो कबड्डीची फायनल, यूपी-बंगळुरू बाहेर

WhatsApp Group

बुधवारी प्रो कबड्डी Pro Kabaddi लीग 2022 च्या दोन्ही उपांत्य फेरीचे सामने खेळले गेला. पहिला सामना पटना पायरेट्स Patna Pirates आणि यूपी योद्धा यांच्यात झाला. यामध्ये पटनाच्या संघाने बाजी मारत अंतिम फेरीत धडक मारली आहे. दुसऱ्या सामन्यात दबंग दिल्लीने Dabang Delhi बंगळुरू बुल्सचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.

उपांत्य फेरीच्या पहिला सामन्यात पटना पायरेट्सने यूपी योद्धाचा 38-27 अशा फरकाने पराभव केला. आता त्यांचा अंतिम सामना 25 फेब्रुवारी रोजी दुस-या उपांत्य फेरीतील विजयी संघ दबंग दिल्लीशी होईल Pro Kabaddi final 2022. दुसऱ्या उपांत्य फेरीत दबंग दिल्लीने रोमहर्षक लढतीत बंगळुरू बुल्सचा 40-35 अशा फरकाने पराभव केला.


दिल्लीविरुद्धच्या सामन्यात बंगळुरूचा कर्णधार पवन शेरावत एकटाच लढताना दिसला. त्याने या सामन्यात सर्वाधिक 18 गुण मिळवले. तर रेडर नवीन कुमारने दिल्लीसाठी 14 गुण मिळवले. त्याला रेडर नीरज नरवाल (5) आणि विजय (4) यांनी चांगली साथ दिली. यामुळेच दिल्लीने विजयाची नोंद करत सलग दुसऱ्या मोसमाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. दिल्लीला पहिल्यांदा आणि पाटनाच्या संघाला विक्रमी चौथ्यांदा जेतेपद पटकावण्याची संधी आहे.

पटना संघाच्या सर्व खेळाडूंनी शानदार खेळ दाखवला. रेडर गुमान सिंगने 8, सचिनने 7, अष्टपैलू मोहम्मदरेज़ा शादलोईने 6 आणि बचावपटू सुनीलने 5 गुण मिळवत संघाला मोठा विजय मिळवून दिला. यूपी संघाकडून श्रीकांत जाधवने सर्वाधिक 10 गुण मिळवले, पण ते संघाला विजय मिळवून देण्यासाठी पुरेसे नव्हते. बचावपटू आशु सिंगने 5 तर रेडर प्रदीप नरवालने केवळ 4 गुण मिळवले.