‘पठाण’ने केली ऐतिहासिक कमाई, 7 दिवसात कमावले एवढे कोटी

WhatsApp Group

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट रिलीज होऊन सात दिवस झाले आहेत. बॉक्स ऑफिसवर पठाणची मोहिनी अजूनही कायम आहे. 25 जानेवारी रोजी रिलीज झाल्यापासून अवघ्या एका आठवड्यात या चित्रपटाने जगभरात 634 कोटींची कमाई केली आहे. ‘पठाण’ ने सातव्या दिवशी भारतात 23 कोटी रुपयांची कमाई केली असून हिंदीमध्ये 22 कोटी रुपये आणि डब केलेल्या सर्व आवृत्त्यांमध्ये 1 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

सातव्या दिवशी परदेशातील कमाई 15 कोटी रुपये आहे. 7 दिवसात ‘पठाण’ ने $29.27 दशलक्ष म्हणजेच 238.5 कोटी रुपये एकट्या परदेशात जमा केले आहेत, तर भारतात एकूण कलेक्शन 330.25 वर पोहोचले आहे.

ज्यामध्ये चित्रपटाने हिंदीमध्ये 318.50 कोटी रुपये आणि डब व्हर्जनमध्ये 11.75 कोटी रुपये कमावले आहेत. शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण व्यतिरिक्त जॉन अब्राहम देखील पठाण चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे.