पठाणचा बॉक्स ऑफिसवर धमाका, पहिल्याच दिवशी 100 कोटींची कमाई करणारा पहिला चित्रपट

WhatsApp Group

शाहरुख खानचा ‘पठाण’ हा रिलीजच्या दिवशी जगभरात सर्वाधिक कमाई करणारा पहिला हिंदी चित्रपट ठरला आहे. पहिल्या दिवशी ‘पठाण’चे एकूण कलेक्शन 106 कोटी रुपये आहे, त्यापैकी 69 कोटी रुपये एकट्या देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर मिळाले आहेत, तर 35.5 कोटींची कमाई परदेशातून झाली आहे.

बॉक्स ऑफिस वर्ल्डवाइडच्या ट्विटनुसार, ‘पठाण’ने उत्तर अमेरिकेतून $1.5 दशलक्ष (रु. 12 कोटींहून अधिक) गोळा केले आहेत. यूके आणि युरोप बॉक्स ऑफिसमधून 650 हजार डॉलर्स (5 कोटी रुपयांहून अधिक) कमावले आहेत. ‘पठाण’ला गल्फ मार्केटमधून $1 दशलक्ष (रु. 8.1 कोटी) पेक्षा जास्त कमाई अपेक्षित आहे. शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाल केल आहे.

शाहरुख खानच्या ‘पठाण’ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी हृतिक रोशनच्या ‘वॉर’ आणि यशच्या ‘केजीएफ 2’चे रेकॉर्ड तोडले आहेत. वॉरने पहिल्या दिवशी सुमारे 50 कोटी कमावले, तर ‘KGF 2’ ने 52 कोटींची कमाई केली. आता पहिल्या वीकेंडला हा चित्रपट जबरदस्त कमाई करेल अशी अपेक्षा आहे. ‘पठाण’च्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनपासून हिंदी चित्रपटसृष्टी पुन्हा रुळावर आल्याचे दिसत आहे.

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘पठाण’मध्ये दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट हिंदीशिवाय तमिळ, तेलुगु भाषेतही प्रदर्शित झाला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दीपिका पदुकोण एका मुलाखतीत शाहरुख खानसाठी म्हणाली होती, ‘मला त्यांच्यासाठी जे वाटत आहे ते मी शब्दात व्यक्त करू शकणार नाही. त्यांच्याशी नाते हे भावना आणि प्रेमाचे आहे. मला वाटते की आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्हाला अनेक अप्रतिम चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली.

Inside मराठीचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा