IPL 2023 : T20 विश्वचषक स्पर्धेतल्या पराभवानंतर ‘या’ स्टार खेळाडूने IPL मध्ये खेळणार नसल्याचं केलं जाहीर

WhatsApp Group

IPL 2023: भारतात आयपीएलची तयारी आतापासून सुरु झाली आहे. पण विश्वचषक स्पर्धेत पराभव झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने मोठा निर्णय घेतला असून IPL 2023 IPL मध्ये खेळणार नसल्याचं जाहीर केलं आहे. कमिन्सने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. कमिन्सने ट्विट करून आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतला आणि लिहिले, ‘पुढच्या वर्षीच्या आयपीएलमध्ये न खेळण्याचा मी कठीण निर्णय घेतला आहे, आंतरराष्ट्रीय वेळापत्रक पुढील 12 महिन्यांसाठी कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांनी भरलेले आहे, त्यामुळे थोडी विश्रांती घेईन असं त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियन संघाचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार आहे. पुढील वर्षी भारतात विश्वचषक होणार आहे. अशा परिस्थितीत मोठी स्पर्धा पाहता कमिन्सने हा निर्णय घेतला आहे. यावेळी ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या T20 विश्वचषकात कांगारू संघ उपांत्य फेरीतही पोहोचू शकला नाही.

IPL 2023 ची तयारी सुरु झाली आहे. सर्व संघांना 15 नोव्हेंबरपर्यंत जाहीर झालेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे सोपवावी लागेल. T20 विश्वचषक संपल्यानंतर आता सर्वांच्या नजरा IPL 2023 च्या रिटेन्शन लिस्टकडे लागल्या आहेत. आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे.

कमिन्स 2014 पासून आयपीएलमध्ये खेळत आहे. त्याने आतापर्यंत एकूण 42 सामने खेळले असून 30.16 च्या सरासरीने आणि 8.54 च्या इकॉनॉमी रेटने 45 बळी घेतले आहेत. दुसरीकडे, त्याने तीन अर्धशतकांच्या मदतीने फलंदाजीत 379 धावा केल्या आहेत.