Pashmina Roshan : हृतिक रोशनची बहीण सुंदरतेत जान्हवी-सारालाही टाकते मागे; लवकरच बॉलिवूडमध्ये करणार एंट्री

Pashmina Roshan :बॉलिवूडमधील प्रसिद्ध कुटुंबांपैकी एक असलेल्या रोशन कुटुंबातील आणखी एक सदस्य चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार आहे. ग्रीक गॉड म्हणून प्रसिद्ध असलेल्या हृतिक रोशनची (Rutvik roshan)बहीण पश्मिना रोशन तुम्हाला लवकरच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
बॉलिवूडचे सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक राजेश रोशन यांची मुलगी पश्मिना रोशन आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. पश्मिना शाहीद कपूरच्या 2003 मध्ये आलेल्या ‘इश्क विश्क’ चित्रपटाच्या सिक्वेलमधून बॉलिवूड करिअरची सुरुवात करणार आहे. पश्मीनाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे, म्हणून आम्ही तुम्हाला तिचे काही बोल्ड फोटो दाखवत आहोत, जे पाहून तुम्ही सारा अली खान आणि जान्हवी कपूरलाही विसराल.
View this post on Instagram
पश्मिना रोशनबद्दल बातमी आहे की तिने अभिनय शिकला आहे, त्यासाठी तिने खास प्रशिक्षणही घेतले आहे. पश्मिना अभिनयाच्या बाबतीत भाऊ हृतिक रोशनकडूनही टिप्स घेते. याशिवाय पश्मिना रोशन नाट्यक्षेत्रातही सक्रिय आहे. यातील सर्वात खास गोष्ट म्हणजे पश्मिना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते. हे फोटो नेहमीच इंटरनेटचे तापमान वाढवत आहेत.