धक्कादायक आरोप! मुंबई हल्ल्याचा दोषी कसाबचा फोन परमबीर सिंह यांनी लपवला!

WhatsApp Group

मुंबई – निवृत्त एसीपी शमशेर खान पठाण यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर आतापर्यंतचा सर्वाच मोठा आरोप केला आहे. 26/11 चा मुख्य गुन्हेगार असलेल्या अजमल आमीर कसाब याला परमबीरवर सिंह यांनी मदत केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कसाबकडून मिळालेला फोन त्यांनी आपल्याकडे ठेवत तपास अधिकाऱ्यांकडे त्यांनी तो फोन दिला नाही, हा तोच फोन होता ज्यावरून कसाबला पाकिस्तानकडून सूचना मिळत असायच्या, असं पठाण म्हणाले आहेत.

पठाण यांनी मुंबईच्या पोलिस आयुक्तांना परमबीर सिंह यांच्यावीरुद्ध चार पानी तक्रार पाठवली आहे. परमबीर सिंह यांनी कसाबसोबत त्याच्या इतर सहकारी दहशतवाद्यांनादेखील मदत केल्याचा गंभीर आरोप पठाण यांनी केला आहे.

पठाण यांनी सांगितले आहे की, 26/11 च्या दिवशी अजमल कसाबल गिरगाव चौपाटी परिसरात पकडण्यात आले. ही बाब कळताच मी माझे सहकारी एन.आर.माळी यांच्याशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी अजमल कसाबकडून एक मोबाइल फोनदेखील जप्त करण्यात आला आहे असे मला सांगितले. त्यावेळी त्यांनी मला सांगितले की एटीएसचे तत्कालीन प्रमुख परमबीर सिंह यांच्यासह अनेक मोठे अधिकारी येथे आले आहेत. माळी यांच्या म्हणण्यानुसार तो फोन कॉन्स्टेबल कांबळे यांच्याकडे होता, मात्र तो फोन एटीएस प्रमुख परमबीर सिंह यांनी काढून घेतला आणि आपल्याजवळ ठेवला.

मोबाइल फोन हा सर्वात महत्त्वाचा पुरावा होता. कसाबला या फोनवरून सर्व सूचना मिळत होत्या. या प्रकरणाचा संपूर्ण तपास मुंबई क्राइम ब्रँचचे पोलीस निरीक्षक महलय हे करत होते. मात्र तो मोबाइल परमबीर सिंह यांनी त्यांच्याकडे दिला नसल्याचे माळी यांनी सांगितले.

पुढे बोलताना शमशेर खान पठाण म्हणाले की, आम्हाला संशय होता की या मोबाईल फोनमध्ये पाकिस्तान आणि भारतातील दहशतवाद्यांच्या हस्तकांचे नंबर असतील. कदाचित या दहशतवादी कटात सामील असलेल्या भारतातील काही प्रभावशाली लोकांचे क्रमांकही फोनमध्ये असावेत. त्यावेळी हा फोन मुंबई क्राईम ब्रँचला दिला असता तर खूप महत्वाची माहिती आम्ही गोळा करू शकलो असतो.