मोठी बातमी: पंकजा मुंडेंचा विधानपरिषदेतून पत्ता कट! यंदाही उमेदवारी नाहीच

WhatsApp Group

मुंबई – विधानपरिषदेच्या निवडणूकीबाबत (Legislative Council Election) मोठी बातमी समोर आली आहे. विधानपरिषदेच्या निवडणूकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचं नाव यंदाही वगळण्यात आलं आहे. या यादीत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड यांना विधानपरिषदेसाठी संधी देण्यात आली आहे. यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच पडली आहे.