नोएडा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आणि विद्यमान आमदार पंकज सिंह यांनी या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मते मिळवण्याचा तसेच देशातील विधानसभा निवडणुकीशी संबंधित सर्वात मोठा विक्रम मोडीत काढला आहे Pankaj singh makes a new record. पंकज सिंह यांनी यावेळी सुमारे एक लाख 80 हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला असून, हा त्यांच्या मागील विजयापेक्षा खूप मोठा विजय आहे. देशातील कोणत्याही विधानसभा निवडणुकीतील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय आहे.
Highest Margin Ever…
Pankaj Singh won by 1,76,000 Votes….#BJPWinningUP pic.twitter.com/GR1MeAKC2q
— Gaurav Goel (@goelgauravbjp) March 10, 2022
पंकज सिंह यांनी अजित पवारांचा विक्रम मोडला – भारतीय निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी बारामती विधानसभेची जागा एक लाख ६५ हजार २६५ मतांनी जिंकून विक्रम केला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांना एक लाख ९५ हजार ६४१ मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे गोपीचंद पडळकर यांना अवघी ३० हजार ३७६ मते मिळाली होती.