Vasai Land Slide : वसईत दरड कोसळली; 4 जणांची सुटका, दोघे अद्यापही ढिगाऱ्याखाली

WhatsApp Group

Vasai Land Slide : मुंबई आणि इतर परिसरात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू झाला असून, त्यादृष्टीने आपत्ती व्यवस्थापनही तैनात करण्यात आले आहे. पालघर  जिल्ह्यातील वसई परिसरामध्ये दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. राजवली वाघरल पाडा या परिसरामध्ये दरड कोसळली आहे. त्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहेत. या दरडीखाली 6 जण अडकले होते. त्यापैकी 4 जणांची सुटका करण्यात आली आहे. तर दोघेजण अजूनही ढिगाऱ्याखाली दबलेले असल्याची माहिती मिळत आहे. वालीव पोलीस आणि वसई विरार महापालिका अग्निशमन दलाचे जवान दुर्घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे.

भारतीय हवामान विभाग (IMD) आणि प्रादेशिक हवामान विभाग, मुंबईकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार 12 आणि 14 जुलै दरम्यान पालघर जिल्ह्यामध्ये जोरदार ते अति जोरदार (अतिवृष्टी ) पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.