Palak Muchhal Wedding Pics: पलक-मिथुन लग्नबंधनात, लग्नाचे पहिले फोटो समोर आले

WhatsApp Group

Palak Muchhal Wedding: लोकप्रिय गायिका पलक मुच्छाल आणि संगीतकार मिथुन शर्मा यांनी रविवारी सात फेरे घेतले. पलक बाला लाल रंगाच्या पेअरमध्ये सुंदर दिसत होती. तर मिथुनही क्रीम रंगाच्या शेरवानीमध्ये खूपच स्मार्ट दिसत होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Palak Muchhal (@palakmuchhal3)

पलक मुच्छाल आणि मिथुन शर्मा यांनी लग्नाचे फोटो शेअर केले आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, “आज आम्ही दोघे कायमचे एकत्र आहोत.  फोटोंमध्ये दोघेही खूप आनंदी दिसत आहेत. पलक आणि मिथुनचे लग्न झाल्यानंतर दोघांनी रिसेप्शन पार्टी आयोजित केली होती. त्यात अनेक मोठे सेलिब्रिटी दिसले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे कपल 12 नोव्हेंबरला इंदूरमध्ये एक पार्टीही ठेवणार आहे.

रुबिना दिलीक आणि तिचा पती अभिनव शुक्ला, शान, कैलाश खेर, सोनाली राठौर, रूपकुमार राठौर, रश्मी देसाई यांनी दोघांचेही स्वागत केले आहे.

पलक आणि मिथुनच्या रिसेप्शनला सोनू निगम, जावेद अली त्याच्या संपूर्ण कुटुंबासह, निर्माता मुकेश भट्ट त्याचा मुलगा विशेष भट्ट, मधुर भांडारकर, रूप कुमार राठोड पत्नी सोनालीसह उपस्थित होते.