अफगाणिस्तानमधील खोस्त प्रांतातील स्पुरा जिल्हा, तसेच कुनार प्रांतामध्ये पाकिस्तानने शुक्रवारी रात्री केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये सुमारे ३० जण ठार झाले आहेत. यात महिला व बालकांचाही समावेश आहे. दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचा दावा पाकिस्तानी प्रसारमाध्यमांकडून करण्यात आला आहे.
पाकिस्तानी विमानांनी खोस्त प्रांतातील स्पुरा जिल्ह्यातील भागांना लक्ष्य केले आहे. किमान २६ पाकिस्तानी विमानांनी खोस्त प्रांतातील स्पुरा जिल्ह्यातील मीरपार, मंडेह, शैदी आणि काई गावांवर हल्ला केला.
65/afg #Afghanistan – #Pakistan https://t.co/bGk60F7zyu
— Arvind Virmani (@dravirmani) April 17, 2022
या हवाई हल्ल्यामध्ये अफगाणिस्तानच्या खोस्त, कुनार प्रांतातील काही नागरिक जखमी झाल्याचेही सांगण्यात आले आहे. खैबर पख्तुनख्वा प्रांतात पाकिस्तानी लष्करावर दहशतवाद्यांनी काही दिवसांपूर्वी केेलेल्या हल्ल्यात सात सैनिक ठार झाले होते. तसेच दुसऱ्या दहशतवादी हल्ल्यामध्ये आणखी एका सैनिकाचा मृत्यू झाला होता. त्यावेळेपासून अफगाणी दहशतवाद्यांवर कारवाई करण्याचे पाकने ठरविले होते.